मिरज येथे २६ पासून रंगणार संगीत महोत्सव 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 मार्च 2017

मिरज - श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव समिती मंडळातर्फे पाडव्याला नववर्षदिनानिमित्त विशेष संगीत महोत्सव आयोजित केला आहे. २६ ते २८ मार्च असे तीन दिवस संध्याकाळी सहा वाजता बालगंधर्व नाट्यगृहात मैफली रंगणार आहे. मंडळाचे अध्यक्ष मधुभाऊ पाटील-मळणगावकर यांनी ही माहिती दिली.

 ता. २६ ला ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा ‘सप्तसूर माझे’ हा मराठी गाण्यांचा कार्यक्रम होईल. प्रसिद्ध निवेदिका स्मिता गवाणकर यांचे सूत्रसंचालन असेल. दुसऱ्या दिवशी (ता. २७) प्रख्यात शास्त्रीय गायिका परवीन सुलताना यांचे शास्त्रीय गायन होईल. तबलासाथ मुकुंदराज देव (ठाणे) आणि संवादिनीसाथ श्रीनिवास आचार्य (मुंबई) हे करतील. शेवटच्या दिवशी (ता. २८) पंडित कालिनाथ मिश्रा (बनारस) यांची १२ वाद्यांची जुगलबंदी होईल. यात तबला, घटम्‌, पखवाज, ढोलकी, सारंगी, की बोर्ड आदींचा समावेश आहे. 

या जुलगबंदीवर मिस इंडिया विजेती खुशबू पांचाळ हिच्यासह दहा नृत्यांगणांचा ‘नाद तांडव’ हा नृत्याविष्कार सादर होईल. 

Web Title: The music played at the festival from 26 Miraj