चाळीस उमेदवार हेच माझे नगरसेवक - उदयनराजे भोसले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

सातारा - सातारा विकास आघाडीचे 40 उमेदवार हेच माझे शहरातील 40 नगरसेवक आहेत. त्यांनी सुचविलेल्या विकासकामांना प्राधान्य द्या. पराभूत उमेदवारांनी नाऊमेद न होता नागरिकांच्या कामात व्यस्त राहा, असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी आज आघाडीच्या पदाधिकाऱ्यांपुढे बोलताना केले.

सातारा विकास आघाडीचे नवनिर्वाचित सदस्य, तसेच पराभूत उमेदवारांची श्री. भोसले यांनी आज बैठक घेतली. त्या वेळी त्यांनी या सूचना केल्या. नवनिर्वाचित नगराध्यक्षा माधवी कदम या वेळी उपस्थित होत्या.

या वेळी मार्गदर्शन करताना उदयनराजे म्हणाले, 'कोण नगरसेवक कोणत्या आघाडीतून निवडून आला, मला त्याच्याशी देणे घेणे नाही. सातारा विकास आघाडीचे 40 जागांवरील 40 उमेदवार हेच माझे नगरसेवक असतील. निर्वाचित सदस्य त्यांच्या प्रभागातील विकासकामे सुचवून ती पूर्ण करून घेतीलच; परंतु पराभूत 18 उमेदवारांच्या वॉर्डातही विकासकामे झाली पाहिजेत. लोकांचे प्रश्‍न सोडविले गेले पाहिजेत. लोकनियुक्त नगराध्यक्षांना या वेळी स्वतंत्र निधीची तरतूद आहे. त्यांच्या अधिकारातून उपलब्ध निधीतून या वॉर्डमधील लोकांची कामे झाली पाहिजेत.''

स्वीकृतसाठी ऍड. बनकर आघाडीवर
पालिकेत 22 जागा घेतलेल्या सातारा विकास आघाडीला दोन नामनिर्देशित सदस्य घेता येतील. त्यात आघाडीचे प्रतोद ऍड. दत्ता बनकर यांचे नाव आघाडीवर घेतले जात आहे. दुसऱ्या जागेसाठी माजी नगराध्यक्ष विजय बडेकर यांचे नाव चर्चेत आहे. पालिकेतून नुकतेच निवृत्त झालेले लेखापाल हेमंत जाधव यांचे नावही चर्चेत आघाडीवर आले आहे. त्यामुळे बडेकर अथवा श्री. जाधव यांच्यापैकी एकाला संधी दिली जाऊ शकते. ऍड. बनकर यांना पाच वर्षांचा कार्यकाल दिला जाण्याची शक्‍यता संपर्कसूत्रांनी व्यक्त केली.

पश्चिम महाराष्ट्र

सांगली - महापालिकेकडून दिले जाणारे विविध दाखले संगणकीकृत देण्यापासून विविध विभागांचे कामकाज ऑनलाईन करण्याच्या उद्देशाने ई-...

02.48 AM

सांगली - राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची योजनेच्या घोषणेला दीड महिन्याचा कालावधी लोटला तरी ऑनलाईन नोंदणीतील अडथळे...

02.48 AM

कोल्हापूर - राजारामपुरीतील गणेशोत्सवाच्या आगमन मिरवणुकीत डॉल्बी लावूच देणार नाही, असा इशारा शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत...

02.27 AM