नाबार्डकडून केडीसीसीच्या चाळीस शाखांची तपासणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

कोल्हापूर - नोटाबंदीच्या काळात जिल्हा बॅंकेत झालेल्या व्यवहाराची तपासणी सुरू असून चार दिवसांत ४० शाखांतील व्यवहारांची तपासणी पूर्ण झाली आहे. प्रत्येक खात्याच्या केवायसीमुळे या तपासणीला विलंब होत आहे. आणखी चार-पाच दिवस ही तपासणी सुरू राहील. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला चलनातून ५०० व १००० च्या नोटा रद्द केल्या. सुरवातीला या नोटा स्वीकारण्याचे अधिकार जिल्हा बॅंकांना दिले होते. पहिल्या तीन दिवसांत कोल्हापूर जिल्हा बॅंकेत सुमारे २४९ कोटी रुपयांच्या नोटा जमा झाल्या. देशभरातील जिल्हा बॅंकांत राष्ट्रीयीकृत बॅंकांपेक्षा जास्त नोटा जमा झाल्याने रिझर्व्ह बॅंकेने जिल्हा बॅंकांना नोटाबंदी केली. तेव्हापासून स्वीकारलेल्या जुन्या नोटा बॅंकेतच पडून आहेत. यावर दररोज काही लाख रुपये बॅंकेला तोटा सहन करावा लागत आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने या नोटा स्वीकारण्याचे आदेश दिल्याने नाबार्डकडून पैसे भरलेल्या  खात्यांची तपासणी करण्याचे आदेश रिझर्व्ह बॅंकेने दिले आहेत. या पार्श्‍वभूमीवर ६ एप्रिलपासून जिल्हा बॅंकेत नाबार्डच्या पथकाकडून प्रत्येक खात्याची तपासणी सुरू आहे. प्रत्येक शाखेत जाऊन त्या शाखेत नोटाबंदीच्या काळात ५० हजारपेक्षा जास्त रक्कम भरलेल्या खातेदारांची तपासणी होत आहे. प्रत्येक खात्याची तपासणी होत असल्याने या प्रक्रियेला विलंब होत असून आतापर्यंत केवळ ४० शाखांतील व्यवहाराची तपासणी पूर्ण झाली आहे.

Web Title: NABARD Check forty branches of KDCC