हिरवा चारा हा यशस्वी दूध उत्पादन, पशूपालनाचा पाया: अण्णा हजारे

मार्तंडराव बुचुडे
रविवार, 10 सप्टेंबर 2017

हिरव्या चार्‍यासाठी बायफने विकसित केलेल्या बाजरा1 या वाणाच्या बियाणे पेरणीचा शुभारंभ हजारे यांच्या हस्ते करण्यात आला त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी आत्माचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब बर्‍हाटे, शेतकरी रामभाऊ गाजरे, तंत्रज्ञान व्यवस्थापक देवेंद्र जाधव, तुकाराम फटांगरे, सरपंच रोहिणी गाजरे, ऊपसरपंच लाभेश औटी, कांतीलाल औटी, दादाभाऊ गाजरे, केशव गाजरे, राजाराम गाजरे आदी मान्यवर उपस्थित होते.

राळेगणसिद्धी : हिरव्या चार्‍यात विद्राव्य स्वरूपातील प्रथिने, स्निग्ध पदार्थ, शर्करा, विविध खनिजे, क्षार आदी जीवनसत्वे मोठ्या प्रमाणात असतात. या सर्व जीवनसत्वांचा जनावरांच्या  वाढीबरोबरच व दुधाळ जनावरांच्या दुध वाढीसाठी चांगला फायदा होतो. हिरवा चारा हा यशस्वी व विकशीत दुध ऊत्पादन व पशूपालनाचा मुलभूत पाया आहे, असे प्रतिपादन जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.

हिरव्या चार्‍यासाठी बायफने विकसित केलेल्या बाजरा1 या वाणाच्या बियाणे पेरणीचा शुभारंभ हजारे यांच्या हस्ते करण्यात आला त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी आत्माचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब बर्‍हाटे, शेतकरी रामभाऊ गाजरे, तंत्रज्ञान व्यवस्थापक देवेंद्र जाधव, तुकाराम फटांगरे, सरपंच रोहिणी गाजरे, ऊपसरपंच लाभेश औटी, कांतीलाल औटी, दादाभाऊ गाजरे, केशव गाजरे, राजाराम गाजरे आदी मान्यवर उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, राज्यभरात दुध ऊत्पदनासाठी तसेच पशूपालन विकासासाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात. दुभत्या जनावरांच्या आहारात हिरव्या चार्‍याची  मोठ्या प्रमाणात गरज असते.

मका, ज्वारी याप्रमाणेच बायफने चार्‍यासाठी उत्पादित केलेली बाजरी हे देखील हिरवा चारा देणारे पीक आहे. पीक ज्वारी आणि मक्यापेक्षा चांगले असल्याचेही हजारे म्हणाले.

बर्‍हाटे म्हणाले, राज्यात हिरव्या चार्‍याचे उत्पादन खरीप व रब्बी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात होते. परंतु उन्हाळ्यात  तुटवडा असल्याने उत्पादन फारच कमी होते. उन्हाळ्यात हिरवा चारा विकत घेणे शेतकर्‍यांना परवडत नाही. अशा परिस्थितीत बाजरी हे कमी दिवसांत व कमी पाण्यात येणारे पीक आहे. उन्हाळी हंगामासाठी बायएफ या संस्थेने संशोधन करून खास शोधून काढले आहे. आत्मा अंतर्गत जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातून एका गावात एका एकरावर प्रात्यक्षिक प्लॉट घेण्यात येणार आहेत.

Web Title: Nagar news Anna Hazare on milk production