करमाळ्याच्या महिलेचा जेजुरीत दिरानेच केला खून

संजय आ. काटे 
रविवार, 24 सप्टेंबर 2017

श्रीगोंदा पोलिसांनी केला गुन्हा उघड 
 

श्रीगोंदे (जिल्हा नगर) : बेपत्ता महिलेचा शोध घेत एक खून प्रकरण उघड करण्याची कामगिरी श्रीगोंदे पोलिसांनी केली. भावजयीचा किरकोळ वादातून दगडाने ठेचून खून करणाऱ्या आरोपीला श्रीगोंदे पोलिसांनी साकुर्डी-जेजुरी येथून त्या पोलिसांच्या ताब्यात दिले. मयत सुमन गोरड वय 45 या पुनवर ता.करमाळा जिल्हा सोलापूर येथील आहेत. आरोपी हा मयत महिलेचा दीर आहे.

याबाबत श्रीगोंदे पोलिस ठाण्याचे निरीक्षण बाजीराव पोवार यांनी हे प्रकरण उघड केले. त्यांनी सांगितले, १२ सप्टेंबर रोजी सुमन गोरड या श्रीगोंदयातून बेपत्ता झाल्याची तक्रार ठाण्यात दाखल केली.

या तक्रारीवरून सदर महिलेचा तपास केला असता त्या महिलेचा दीर धुळा बाबा गोरड (वय ४०) याची चौकशी केली. त्यावेळी त्याने सुमन गोरड यांना जमीन घेऊन देतो अशी बतावणी केली. त्यांचा त्यातून वाद झाला आरोपी धुळा गोरड याने त्यांच्या भावजय सुमन यांचा  डोक्यात दगड घालून खून करीत पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत व मयताच्या जवळील साहित्य पुरून टाकले.  पोवार व त्यांच्या पथकाने हा किचकट गुन्हा उघड करून आरोपी घटना जेजुरी पोलिसांच्या ताब्यात दिला.