देशीदारू वाहून नेणारी कार पकडली; एकाविरुद्ध गुन्हा 

हरिभाऊ दिघे
शनिवार, 8 जुलै 2017

तळेगाव ते वडगावपान रस्त्याने इंडिकाकारमधून ( क्र. एमएच ४३ ए ३११४ ) बेकायदा देशीदारूची वाहतूक होत असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली टाळूला पोलीसांनी शनिवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास सदर इंडिकाकार पकडली.

तळेगाव दिघे : संगमनेर तालुका पोलिसांनी बेकायदा देशीदारूची वाहतूक करणारी इंडिकाकार पकडली. या कारमधून २४ हजार ९६० रुपयांची देशीदारू हस्तगत करण्यात आली. शनिवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास तळेगाव दिघे ते वडगावपान रस्त्यावर तळेगाव शिवारात पोलिसांनी ही कारवाई केली.

तळेगाव ते वडगावपान रस्त्याने इंडिकाकारमधून ( क्र. एमएच ४३ ए ३११४ ) बेकायदा देशीदारूची वाहतूक होत असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली टाळूला पोलीसांनी शनिवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास सदर इंडिकाकार पकडली. मुद्देमालासह पोलिसांनी इंडिकाकार ताब्यात घेतली.

पो. कॉ. सुनील यशवंत रत्नपारखी यांनी फिर्याद दिली. त्यानुसार बेकायदा देशीदारू बाळगून वाहतूक केल्याप्रकरणी आरोपी हिरालाल उत्तम चव्हाण ( रा. जनतानगर, संगमनेर ) याच्याविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.