विद्युतवाहक तारांचा टाॅवर उभारण्याचा प्रयत्न शेतकऱयांनी पाडला हाणून

सनी सोनावळे
रविवार, 10 सप्टेंबर 2017

त्यानंतर पोलिस संरक्षणात हे काम सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला असता त्यासही शेतक-यांनी विरोध करून जमीन अधिगृहणाच्या आदेशाविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, या वादातून तोडगा काढण्यासाठी शेतकरी व कंपनीच्या अधिका-यांमध्ये पारनेर पोलिस ठाण्यात बैठकही झाली मात्र त्यातून काहीही तोडगा निघू शकला नाही.     

टाकळी ढोकेश्वर : जमिनींच्या नुकसानभरपाईबाबत विद्युतवाहक तारांचे टॉवर उभारणा-या कंपनीकडून ठोस हमी दिली जात नसल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी सावरगाव
(ता.पारनेर) येथील शेतक-यांनी टॉवर उभारणीचे काम बंद पाडले. 

याबाबत अधिक माहीती अशी की, नागपूरहून पुण्याकडे जाणा-या 756 किलोवॅट क्षमतेच्या विद्युतवाहक तारांच्या टॉवर उभारणीचे काम सध्या सावरगाव परिसरात सुरू आहे. यापूर्वीही या भागातून विद्युतवाहक तारांच्या दोन टॉवरलाईन गेल्या असून त्यात या भागातील शेतक-यांना जमीनी गेल्या आहेत. अल्पभुधारक असलेल्या शेतक-यांच्या शेतातून तिन टॉवरलाईन जाणार असतील तर या शेतीतून काय पिकवायचे असा प्रश्‍न या शेतक-यांपुढे आहे. असे असतानाही शासनाने लोकहिताचे काम म्हणून या शेतांमध्ये टॉवर उभारणीचे आदेश दिले असले तरी त्यापोटी मिळणारी भरपाई योग्य नको का असा सवाल शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे. 

त्यानंतर पोलिस संरक्षणात हे काम सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला असता त्यासही शेतक-यांनी विरोध करून जमीन अधिगृहणाच्या आदेशाविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, या वादातून तोडगा काढण्यासाठी शेतकरी व कंपनीच्या अधिका-यांमध्ये पारनेर पोलिस ठाण्यात बैठकही झाली मात्र त्यातून काहीही तोडगा निघू शकला नाही.     

या बैठकीत कंपनीचे अधिकारी ए.पी रेड्डी, पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे शिवसेनेचे तालुका प्रमुख निलेश लंके,राहुल झावरे व शेतकरी प्रतिनीधी म्हणुन शिवाजी भोसले,अंकुश लांडगे,लक्ष्मण गायखे यांनी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. पोलिस संरक्षण पाठवूनही शेतक-यांनी नुकसान भरपाईच्या लेखी अश्‍वासनाशिवाय काम सुरू करण्यास मनाई केली.

टॅग्स