संगमनेर: दोन मुलांची हत्या करून पित्याची आत्महत्या

हरिभाऊ दिघे
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

तिहेरी हत्याकांडाचे गूढ...
दोन मुलांची गळा दाबून हत्या व स्वत: आत्महत्या करण्याचे कृत्य मयत अशोक अशोक फटांगरे यांचे केले किंवा या तिघांचा घातपात करण्यात आला याचा पोलिस कसून शोध घेत आहे. हे तिहेरी हत्याकांडाचे गूढ निर्माण झाले आहे.

तळेगाव दिघे (जि. नगर) : संगमनेर तालुक्यातील पोखरीबाळेश्वर येथे रात्रीच्यावेळी राहत्या घरात दोन मुलांची गळा दाबून हत्या करून पित्याने लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.. या घटनेने घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या तिहेरी हत्याकांडाचे गूढ निर्माण झाले आहे.

मुलगा प्रफुल्ल अशोक फटांगरे (वय ७), मुलगी अस्मिता अशोक फटांगरे (वय ११) अशी हत्या केलेल्या मुलांची नावे असून अशोक संतू फटांगरे (वय ३५) असे आत्महत्या केलेल्या पित्याचे नाव आहे. संगमनेर तालुक्यातील पोखरीबाळेश्वर या ठिकाणी कौलाच्या घरात ते राहत होते. अशोक फटांगरे यांची पत्नी माहेरी गेलेली होती. दरम्यान बुधवारी मध्यरात्री अशोक संतू फटांगरे यांनी मुलांची गळा दाबून हत्या करून स्वता झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. नजीकच्या रहिवाशांच्या हा प्रकार लक्षात येताच पोलिसांना माहिती देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक दिलीप निघोट, सहायक पोलिस निरीक्षक कैलास परांडे, पोलिस उपनिरीक्षक अन्सार इनामदार, पोलिस नाईक किशोर लाड, संतोष खरे यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमनेर कॉटेज रुग्णालयात हलविण्यात आले. मुलांची हत्या करून स्वत: आत्महत्या केलेल्या अशोक फटांगरे याची घरची परिस्थिती गरिबीची आहे. मुलगी अस्मिता ही गावातील प्रगती विद्यालयात सहावीत, तर मुलगा प्रफुल्ल हा प्राथमिक शाळेत दुसरीत शिकत होता. या घटनेमागील निश्चित कारण मात्र समजू शकले नाही. याप्रकरणी घारगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक दिलीप निघोट अधिक तपास करीत आहे.

तिहेरी हत्याकांडाचे गूढ...
दोन मुलांची गळा दाबून हत्या व स्वत: आत्महत्या करण्याचे कृत्य मयत अशोक अशोक फटांगरे यांचे केले किंवा या तिघांचा घातपात करण्यात आला याचा पोलिस कसून शोध घेत आहे. हे तिहेरी हत्याकांडाचे गूढ निर्माण झाले आहे.