जमिनीच्या व्यवहारात  व्यापाऱ्याची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 जून 2017

नगर - जमीन खरेदी-विक्री व्यवहारात मुंबईच्या व्यापाऱ्याची फसवणूक केल्याच्या आरोपावरून डॉ. प्रकाश कांकरिया, सचिन जाधव यांच्यासह नऊ जणांविरुद्ध भिंगार कॅम्प पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

डॉ. प्रकाश कांकरिया, डॉ. सुधा प्रकाश कांकरिया, सचिन जाधव (रा. मंगलगेट), संजय भगवान बुधवंत (रा. सूर्यानगर, तपोवन रोड), रफिक हुसेन शेख, मोहम्मद उमर इब्राहिम शेख, सादिक शेख, योगेश शिंदे, गौरव बेल्हेकर (रा. केडगाव), अशी आरोपींची नावे आहेत.

याबाबत मुंबईचे व्यापारी पवन चंदूलाल खेमाणी यांनी फिर्याद दिली आहे. डॉ. कांकरिया यांनी २२ फेब्रुवारीला खेमाणी यांना दुय्यम निबंधक कार्यालयात भिंगारमधील ८०९३.७३ चौरस मीटर जमिनीची कायम खरेदी, ताबा पावती, कधी रद्द न होणारे मुखत्यारपत्र, हमीपत्र व घोषणापत्र लिहून दिले होते. त्यानंतरही कांकरिया यांनी त्या जमिनीतीलच ५२६०.४२ चौरस मीटर क्षेत्र खेमाणी यांच्या परस्पर संजय भगवान बुधवंत यांना विकले. याबाबत विचारणा केली असता, आरोपींनी आपणास धमकावल्याचे खेमाणी यांनी फिर्यादीत म्हटले आहे.