मंजुळा शेटे यांच्या मृत्यूच्या न्यायालयीन चौकशीची मागणी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 जुलै 2017

नगर - मुंबई येथील कारागृहात मृत्यू झालेल्या मंजुळा शेटे यांच्या हत्येची न्यायालयीन चौकशी व्हावी. या प्रकरणामुळे राज्यात महिला कोठेही सुरक्षित नसल्याचे स्पष्ट होते, असा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला आहे.

वाघ म्हणाल्या, 'शेटे मृत्यू प्रकरण सुरवातीपासून संशयास्पद वाटत होते. कारागृहातील महिलांच्या जबाबात अमानवी पद्धतीने तिला मारहाण झाल्याचे स्पष्ट झाले. वैद्यकीय अहवालात तिच्या गुप्तांगावर जखमा असल्याचे म्हटले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. न्यायालयीन चौकशी झाल्याशिवाय मंजुळाच्या हत्येचे गूढ उलगडणार नाही.''