भाजप-शिवसेनेची भूमिका एकच;कामाची पद्धत वेगळी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

नगर - भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची भूमिका एकच असून, काम करण्याची पद्धत वेगळी आहे. दोन्ही पक्षांचे संबंध चांगले आहेत. त्यांचे मंत्री कॅबिनेटमध्ये येतात. कॅबिनेटमध्ये मतभेद नाहीत. आंदोलन करणे ही त्यांच्या पक्षाची भूमिका आहे, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी बुधवारी व्यक्त केले. 

दानवे म्हणाले, ""राज्यात तीन हजार 497 ग्रामपंचायतींची निवडणूक नुकतीच झाली. यात गावपातळीवर विविध राजकीय पक्षांची मंडळे (पॅनेल) होती. त्यामुळे कोणत्या पक्षाचे पॅनेल आले, हे स्पष्ट होते. भाजपच क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. राज्यात भाजपचे एक हजार 682, शिवसेनेचे 344, कॉंग्रेसचे 475 आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 525 सरपंच निवडून आले. कर्जमाफी मिळणार याबाबत शेतकऱ्यांनी निश्‍चिंत राहावे. कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांवर जमा होतील. 34 हजार 299 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात येईल. बोगस अर्जांची छाननी सुरू आहे.'' 

जनतेचा विश्‍वास वाढला 
"सरकारवर आमचा विश्‍वास उरला नाही,' असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटल्याबाबत रावसाहेब दानवे म्हणाले, ""हजारे यांनी तसे सांगितले असले, तरी जनतेचा मात्र भाजपवर विश्‍वास वाढला आहे, हे लोकसभा व विधानसभेनंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत सिद्ध झाले आहे. हजारे आमचे आदर्श आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो. त्यांच्या मागण्यांचा मसुदा आल्यावर आम्ही त्यावर निर्णय घेऊ.'' 

Web Title: nagar news shiv sena bjp