पारनेर: खंडोबा देवस्थान ट्रस्टवर भाजप, राष्ट्रवादीचा वरचष्मा

सनी सोनावळे
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

याबाबत अधिक माहीती अशी की,आॅगस्ट महीन्यात जुन्या मंडळाची मुदत संपली होती तालुक्यासह  बाहेरील जिल्ह्यातील भाविक व  विविध पक्षातील पदाधिकार्‍यांसह एकुण ११५ लोकांनी याकरीता अर्ज केला होता तीन दिवस मुलाखती घेण्यात आल्या त्यातुन १५ विश्वस्तांची निवड नगर येथील सहाय्यक धर्मादाय उपायुक्त बी.टी.येंगडे यांनी आज जाहीर केल्या.

टाकळी ढोकेश्वर : पिंपळगाव रोठा (ता. पारनेर) येथील 'ब' वर्ग असलेले व प्रतीजेजूरी समजले जाणारे खंडोबा देवस्थान ट्रस्टची नुतन विश्वस्त मंडळ आज (शनिवार) जाहीर करण्यात आले. यामध्ये  भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा असल्याचे दिसुन येत असुन अनेक नविन चेहर्‍यांना यामध्ये संधी देण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहीती अशी की,आॅगस्ट महीन्यात जुन्या मंडळाची मुदत संपली होती तालुक्यासह  बाहेरील जिल्ह्यातील भाविक व  विविध पक्षातील पदाधिकार्‍यांसह एकुण ११५ लोकांनी याकरीता अर्ज केला होता तीन दिवस मुलाखती घेण्यात आल्या त्यातुन १५ विश्वस्तांची निवड नगर येथील सहाय्यक धर्मादाय उपायुक्त बी.टी.येंगडे यांनी आज जाहीर केल्या.

यामध्ये अॅड.पांडुरंग गायकवाड यांच्यासह अमर गुंजाळ,बन्सी ढोमे,किसन मुंढे,
देविदास क्षिरसागर यांच्यासह भाजप पक्षातील भाजपाच्या महीला अध्यक्षा अश्विनी थोरात,कासारे गावाचे उपसरपंच व टाकळी ढोकेश्वर भाजपचे गटप्रमुख महेंद्र नरड,
दैठेणे गुंजाळचे उपसरपंच साहेबराव गुंजाळ,मनिषा जगदाळे,हनुमंत सुपेकर,चंद्रभान ठुबे हा भाजपला मानणारा गट आहे त्याचबरोबर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला मदत करणारे अभ्युदय बँकेचे संचालक मोहन घनदाट,बाजार समितीचे संचालक गंगाराम बेलकर,किसन धुमाळ,दिलीप घोडके हा राष्ट्रवादी काँग्रेसचा गट मानला जातो.
यामध्ये अनेक नविन चेहर्‍यांना संधी दिली असुन लवकरच अध्यक्षांसह इतर निवडी करण्यात येतील अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे.

पश्चिम महाराष्ट्र

सातारा - जिल्हा शासकीय रुग्णालयातील गैरसोयींमुळे सर्वसामान्य नागरिकाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. रुग्णांसह त्यांच्या...

02.39 AM

कऱ्हाड - मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नवमहाराष्ट्र युवा अभियानांतर्गत जागर युवा संवाद कार्यक्रमाद्वारे...

01.39 AM

सोलापूर - प्राप्त स्थितीशी सामना करत समर्थ बनून सक्षम व उद्योजिका बनण्याचा कानमंत्र लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महाविद्यालयातील...

12.24 AM