तळेगाव महाविद्यालयात वृक्षारोपण; विद्यार्थ्यांचा वृक्षसंवर्धनाचा निर्धार

हरिभाऊ दिघे
शुक्रवार, 14 जुलै 2017

सह्याद्री शिक्षण संस्थेच्या संगमनेर तालुक्‍यातील तळेगाव दिघे येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वृक्षलागवड मोहीम हाती घेतली. स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबासाहेब कांदळकर व अनिल कांदळकर यांच्या हस्ते वृक्षरोपाची लागवड करून या मोहिमेस प्रारंभ करण्यात आला.

तळेगाव दिघे (जि. नगर) - सह्याद्री शिक्षण संस्थेच्या संगमनेर तालुक्‍यातील तळेगाव दिघे येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वृक्षलागवड मोहीम हाती घेतली. स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबासाहेब कांदळकर व अनिल कांदळकर यांच्या हस्ते वृक्षरोपाची लागवड करून या मोहिमेस प्रारंभ करण्यात आला.

महाविद्यालयीन विद्यार्थी - विद्यार्थीनींनी वृक्षारोपण करण्याचा संकल्प करीत वृक्षसंवर्धनाचा निर्धार केला. यावेळी प्राचार्य डॉ. बाळासाहेब लावरे, उपसरपंच बाळासाहेब दिघे, बाबासाहेब कांदळकर, सचिन दिघे, अनिल कांदळकर, भागवत दिघे, नवनाथ रहाणे, भाऊसाहेब दिघे, रवींद्र दिघे, प्रा. मच्छिंद्र नेहे उपस्थित होते. वृक्ष लागवड व संवर्धन काळाची गरज बनल्याने सर्वांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. बाळासाहेब लावरे यांनी केले. विद्यार्थ्यांनी श्रमदान करीत खड्डे खोदून वृक्षरोपांच्या लागवडीस सुरुवात केली. अशोक कांदळकर यांनी आभार मानले.