'प्रलोभनांना बळी न पडता चारित्र्यसंपन्न व आदर्श बना'

सौ. वैशाली चव्हाण यांनी ज्ञानगंगा विद्यानिकेतन मांचीहिल येथे माता पालक व मुलींना मार्गदर्शनपर व्याख्यान प्रसंगी
सौ. वैशाली चव्हाण यांनी ज्ञानगंगा विद्यानिकेतन मांचीहिल येथे माता पालक व मुलींना मार्गदर्शनपर व्याख्यान प्रसंगी

संगमनेर (नगर): माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात वावरत असताना कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. जीवनात अगोदर स्वतःवर प्रेम करायला शिका. आपल्या वर्तनाने आपल्या आई-वडिलांच्या माना खाली जातील व आपल्यालाही सामाजिक संकटांना तोंड द्यावे लागेल, असे वागू नका असे प्रतिपादन सौ. वैशाली चव्हाण यांनी ज्ञानगंगा विद्यानिकेतन मांचीहिल येथे माता पालक व मुलींना मार्गदर्शनपर व्याख्यान प्रसंगी केले.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, 'मुलींनी आईशी मैत्रीचं नातं निर्माण करुन आपले विचार आईशी व्यक्त केले पाहिजे व आई वडिलांची अपुरी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहीजे. जीवनात शेळी बनून जगण्यापेक्षा वाघिणीसारखं जगा. व्हॉट्सअॅप, फेसबुकसारख्या माध्यमांचे दुष्परिणाम जाणून घ्या व आवश्यक तेवढाच योग्य वापर करा. आपले ध्येय निश्चित करून त्या ध्येयाच्या यशस्वितेसाठी सातत्याने प्रयत्न करा. हे सगळे करत असताना आपला पाय चुकीचा पडणार नाही, याचीही दक्षता घ्या.'

यावेळी व्यासपीठावर संचालिका निलिमा गुणे, प्राचार्य विजय पिसे, उपप्राचार्य गंगाधर चिंधे, मुख्याध्यापिका योगिता दुकळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुली व माता पालकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सौ. बो-हाडे व प्राचार्य पिसे यांनीही आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मानसी ज-हाड, परिचय सायली ज-हाड, सूत्रसंचालन प्रीतल गुळवे व आभार नम्रता हजारे यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन अलका गोसावी यांनी केले. या व्याख्यानासाठी आश्वी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. कटके यांचे सहकार्य लाभले. यावेळी परिसरातील माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com