मोबाईल शॉपी चालकाची गळफास घेवून आत्महत्या

हरिभाऊ दिघे
रविवार, 10 सप्टेंबर 2017

झरेकाठी येथील  सतिश बाबुलाल मकावाने ( वय २५ ) वर्ष या तरुणाचे गुहा शिबलापुर रस्त्यावर झरेकाठी शिवारात मोबाईल रिपेअरींगचे दुकान असुन शुक्रवारी रात्री दुकानाचे काम करून घरी गेला. जेवण करुण नेहमीप्रमाणे जवळच असलेल्या आदर्श क्रिडा सांस्कृतिक व युवा विकास मंडळाच्या व्यायाम शाळेत झोपण्यासाठी तो गेला.

तळेगाव दिघे (जि. नगर) : संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथील  एका मोबाईल शॉपी चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.

झरेकाठी येथील  सतिश बाबुलाल मकावाने ( वय २५ ) वर्ष या तरुणाचे गुहा शिबलापुर रस्त्यावर झरेकाठी शिवारात मोबाईल रिपेअरींगचे दुकान असुन शुक्रवारी रात्री दुकानाचे काम करून घरी गेला. जेवण करुण नेहमीप्रमाणे जवळच असलेल्या आदर्श क्रिडा सांस्कृतिक व युवा विकास मंडळाच्या व्यायाम शाळेत झोपण्यासाठी तो गेला. शनिवारी सकाळी सतिष याचा पुतण्या मिथुन मकवाने  शाळेत जात असताना त्याला व्यायाम शाळेचा दरवाजा उघडा दिसल्याने त्याने आत डोकावले असता त्याला सतिश याने गळफास घेउन आत्महत्या केल्याचे दिसले.

त्याने सतिशचे वडील बाबुलाल मकवाने यांना माहिती दिली. पोलीस पाटील सुदाम वाणी यांनी आश्वी पोलीस स्टेशनला माहिती दिली असता पोलिस निरिक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड. काॅ. तात्याराव वाघमार, भारत जाघव, महादु खाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यांनंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी  प्रवरा ग्रामीण रुग्णालयात हलविला. आत्महत्येचे निश्चित कारण समजू नाही.