नगर: कऱ्हेघाटात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

crime
crime

तळेगाव दिघे (जि. नगर) : नाशिक - पुणे महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील कऱ्हेघाट येथील देवीच्या मंदिराजवळ पंचवीस वर्षीय युवकाने सुताच्या दोरीने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सदाशिव मल्हारी सांगळे (वय २५ रा. कऱ्हे) असे या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. बुधवारी पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : सदाशिव मल्हारी सांगळे नामक युवकाचा मृतदेह कऱ्हेघाट शिवारातील देवीच्या मंदिराजवळील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. नाशिक - पुणे महामार्गावरून जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांनी सदर मृतदेह पाहिला असता याबाबत त्यांनीनातेवाईकांना व पोलिसांना माहिती दिली. पोलीस नाईक किशोर पालवे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मयत युवक वाहन चालक होता. त्याने फायनान्सवर पिकअप जीप वाहन घेतले होते. मात्र फायनान्सचे हप्ते थकल्यामुळे त्याचे वाहन फायनान्स कंपनीने ओढून नेले होते. सदाशिव सांगळे याची पत्नीही नांदत नव्हती, त्यामुळेच त्याने आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.

सोमनाथ सांगळे यांनी पोलिसांत खबर दिली. त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किशोर पालवे अधिक तपास करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com