'राष्ट्रवादी'चे नोटाबंदीविरोधात चक्का जाम आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

नोटाबंदीविरोधात पुणे-बंगळूर महामार्ग रोखल्याने वाहनांच्या रांगा
कोल्हापूर - नही चलेगी, नही चलेगी दादागिरी नही चलेगी, मोदी सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय, मोदी सरकार चलो जाओ, अशा घोषणा देत राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुणे-बंगळूर महामार्गावर शक्तिप्रदर्शनाद्वारे सोमवारी "चक्का जाम' आंदोलन केले. सुमारे तासभर महामार्ग रोखल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसने राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. आज दुपारी बाराच्या सुमारास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते तावडे हॉटेल चौकात एकत्रित आले. आमदार हसन मुश्रीफ दाखल झाल्यानंतर शक्तिप्रदर्शन करून कार्यकर्ते महामार्गाच्या दिशेने रवाना झाले. रस्त्याच्या दोन्ही बाज्‌ूचा मार्ग रोखून धरला. खासदार धनंजय महाडिक आंदोलनात सहभागी झाले. अचानक महामार्ग रोखल्याने सांगली फाट्यापासून कागलपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

मुश्रीफ यांनी महामार्गाची डावी, तर महाडिक यांच्यासह "राष्ट्रवादी'चे जिल्ह्यातील नेते व कार्यकर्त्यांनी महामार्गाच्या उजव्या बाजूला ठिय्या मांडला होता. उन्हाचा पारा वाढत असला तरी मुश्रीफ रस्त्यावर बसल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला होता. पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे, सूरज गुरव यांच्यासह पोलिस अधिकारी मुश्रीफ यांची समूजत काढत होते. दुपारी एक वाजता मुश्रीफ यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलनामुळे वाहनचालकांची गैरसोय झाली. "आंदोलन करायचे, तर मंत्र्यांच्या घरावर जा. रस्ता कशासाठी अडविता? अशा संतत प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या.

Web Title: ncp agitation for currency ban oppose