सोलापूरकरांसाठी न्यूरो रिहॅबिलिटेशनची सुवीधा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

सोलापूर- रुग्णांबरोबरच त्यांच्या नातेवाइकांनाही राहण्यासाठी मोफत सोय... बेड लिफ्ट... पीटीएस (न्यूमॅटिक ट्रान्स्पोर्ट सिस्टिम)... एमआरआय कम्पॅटेबल व्हेंटिलेटर.. रुग्णाला डायट फूड... न्यूरो रिहॅबिलिटेशन... अशा अत्याधुनिक सुविधा असलेले सोलापुरातील पहिलेच अतिशय उच्च दर्जाचे "सीएनएस' (चंदन न्यूरो सायन्स) हॉस्पिटल निर्माण केले आहे. सोलापूर-मंगळवेढा रस्त्यावर देगावजवळ उभारलेल्या या हॉस्पिटलचे रविवारी (ता. 26) उद्‌घाटन होत आहे, अशी माहिती डॉ. प्रसन्न व डॉ. सीना कासेगावकर यांनी आज दिली. 

सोलापूर- रुग्णांबरोबरच त्यांच्या नातेवाइकांनाही राहण्यासाठी मोफत सोय... बेड लिफ्ट... पीटीएस (न्यूमॅटिक ट्रान्स्पोर्ट सिस्टिम)... एमआरआय कम्पॅटेबल व्हेंटिलेटर.. रुग्णाला डायट फूड... न्यूरो रिहॅबिलिटेशन... अशा अत्याधुनिक सुविधा असलेले सोलापुरातील पहिलेच अतिशय उच्च दर्जाचे "सीएनएस' (चंदन न्यूरो सायन्स) हॉस्पिटल निर्माण केले आहे. सोलापूर-मंगळवेढा रस्त्यावर देगावजवळ उभारलेल्या या हॉस्पिटलचे रविवारी (ता. 26) उद्‌घाटन होत आहे, अशी माहिती डॉ. प्रसन्न व डॉ. सीना कासेगावकर यांनी आज दिली. 

डॉ. कासेगावकर म्हणाले, 2013 पासून चंदन न्यूरो सायन्स हॉस्पिटल सोलापूरकरांच्या सेवेत आहे. आता देगाव रोडवरील नव्या विस्तीर्ण जागेमध्ये एका छताखाली न्यूरॉलॉजी, रेडिओलॉजी, पॅथॉलॉजी, सर्जन, ऍनेस्थेशिया, पिडीयाट्रिक, कार्डिऑलॉजी, डायबेटिस, ऑर्थोपेडिक, युरॉलॉजी, प्लास्टिक सर्जन, डायटेशियन, स्पीच थेरपी अशा अनेक सुविधांनी सज्ज हे हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. 

मानवी चुका टाळून तंत्रावर भर 
हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र रेडिओलॉजी विभाग उभारण्यात आला आहे. यात मल्टिस्कॅन स्लाइट सीटी स्कॅन, अल्ट्रासाउंड स्कॅन आणि कलर डॉप्लर, डिजिटल एक्‍स-रे यांचा समावेश आहे. एमआरआय कम्पॅटेबल वेंटीलेटर ही आधुनिक सुविधा प्रथमच सोलापुरात सुरू होणार आहे. या यंत्राद्वारे मानवी चुका टाळून रुग्णाच्या प्रकृतीवर लक्ष देणे सोपे होणार आहे. पक्षाघाताचा रुग्ण हा नेहमी इतरांवर अवलंबून असतो. अशा रुग्णांना कमी खर्चामध्ये राहण्याची सोय करण्यात येणार आहे. या आजाराचा रुग्ण वेळेवर हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यास पूर्ण बरा होण्याचे प्रमाण जास्त असते. अशा रुग्णांसाठी तत्पर सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. युरोप, अमेरिका व जर्मन आदी देशांतील हॉस्पिटलमध्ये वापरल्या जाणाऱ्या अद्ययावत बेड चंदन हॉस्पिटलमध्ये वापरल्या जाणार आहेत. रुग्णाला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर घेऊन न जाता पूर्ण बेड स्थलांतरित करू शकतो, असे बेड वापरले जाणार आहेत. 

निगेटिव्ह व पॉझिटिव्ह प्रेशर रूम 
निगेटिव्ह प्रेशर रूम व पॉझिटिव्ह प्रेशर रूम या सुविधा पहिल्यांदाच सोलापुरात चंदन हॉस्पिटलमध्ये देण्यात येणार आहेत. निगेटिव्ह प्रेशर रूममध्ये न्यूमोनियासारख्या आजारांच्या रुग्णांना ठेवण्यात येणार असून त्यांच्या आजारामुळे तयार होणारे जंतू बाहेर जाऊ नयेत याची खास काळजी घेण्यात येणार आहे. तर पॉझिटिव्ह प्रेशर रूममध्ये जे खूप संवेदनशील असतात, अशा रुग्णांपर्यंत बाहेरची हवा येऊ दिली जात नाही. 

"पीटीटी'ची सोय 
रुग्णाच्या रक्तासह विविध नमुने प्रयोगशाळेत पाठवताना ते मामा-मावशींच्या हाती पाठवले जातात. त्यात वेळ जातो. चुकाही होण्याचा धोका असतो. हा सध्याच्या प्रणालीतील दोष लक्षात घेऊन "सीएनएस'मध्ये "पीटीटी' (न्यूमॅटिक ट्रान्स्पोर्ट सिस्टिम)ची सोय केली आहे. याद्वारे एका विशेष यंत्रणेतून रुग्णाचे ब्लड, युरिनसह औषधांचे सॅंपल्स संबंधित विभागापर्यंत यांत्रिक पद्धतीने पोच होणार आहेत. ही सोय असलेले सोलापुरातील "सीएनएस' हे एकमेव हॉस्पिटल आहे. 

कॅंटीनमध्ये मिळेल डायट फूड 
हॉस्पिटलच्या तळघरात कॅंटीनची सोय करण्यात आली आहे. रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांसाठी अत्यंत कमी किमतीमध्ये अन्न देण्यात येणार आहे. आयसीयूमधील व इतर रुग्णांना आहारतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आहार देण्याची सोय करण्यात आली आहे. अन्न तयार करताना स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाणार आहे. 

अद्ययावत आयसीयू 
आयसीयू विभागात 40 बेड असतील. यात अद्ययावत व्हेंटिलेटर असणार आहेत. या विभागात 24 तास तज्ज्ञ डॉक्‍टर व नर्स आपली सेवा पुरवतील. प्रत्येक रुग्णाकडे स्वतंत्रपणे लक्ष पुरविले जाईल. आयसीयूमध्ये सेंट्रल कॉम्प्युटराइज्ड यंत्रणा उभी करण्यात आली आहे. जिथून रुग्णांच्या काळजीसाठी आवश्‍यक ती यंत्रणा पुरवली जाईल. हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या नातेवाइकास लॉकरसह विनाशुल्क राहण्याची सुविधा देण्यात येणार आहे. 
 
मेडिकल 24 तास खुले 
रुग्णांच्या औषधांसाठी 24 तास मेडिकल खुले असणार आहे. ही औषधे ठेवण्यासाठी अद्ययावत तंत्राचा वापर करण्यात आला आहे. तसेच रुग्णांना औषधे देताना टेस्ट केल्यानंतर कोणती व किती प्रमाणात अँटिबायोटिक औषधे वापरायची हे ठरविले जाणार आहे. यामुळे योग्य प्रमाणात रुग्णांना औषधे देण्यात येतील व रुग्णांच्या पैशांमध्ये बचतच होईल. 

अशी असेल नवी इमारत 
नव्या हॉस्पिटलची इमारत पाच मजली असणार आहे. तळमजल्यावर स्वच्छ कॅंटीन, कॅज्युलिटी व रेडिओलॉजी विभाग, पहिल्या मजल्यावर ओपीडी, फार्मसी, फिजिओथेरपी, पॅथॉलॉजी लॅब. दुसऱ्या मजल्यावर रुग्णांसाठी वॉर्ड व स्पेशल रूम. तिसऱ्या मजल्यावर स्पेशल रूम, एक्‍झिक्‍युटिव्ह रूम, डीलक्‍स रूम, चौथ्या मजल्यावर आयसीयू तर पाचव्या मजल्यावर चार प्रकारचे ऑपरेशन थिएटर असणार आहेत. 

संपर्क - डॉ. प्रसन्न कासेगावकर (9922088000)

Web Title: Neuro Rehabilitation service for solapur