भटके गोसावी समाजाची शासकीय नोंद व्हावी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 एप्रिल 2017

समाजाचे धरणे आंदोलन - शेतकऱ्यांची कर्जे माफ करण्याची मागणी
सांगली - भटके गोसावी समाजाची शासनदरबारी नोंद नाही. त्यामुळे या समाजाला सवलती मिळण्यात अडचणी येत आहेत. मुलांना शिक्षण घेता येत नाही. यामुळे या समाजाची कायद्यात आणि शासनदरबारी नोंद व्हावी, यासह विविध मागण्यांसाठी भटके गोसावी समाजाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे राज्य अध्यक्ष उदय घाडगे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. गोसावी समाजाला कसण्यासाठी जमीन द्यावी, व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य मिळावे, मुलांच्या शिक्षणासाठी शासकीय दाखले देण्याची सोय करावी, या समाजातील कुटुंबांची दारिद्रयरेषेखालील यादीत नोंद करावी, बार्टी सामाजिक न्याय विभागामार्फत समाजाचे संशोधन करून त्यांना न्याय द्यावा, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

या आंदोलनात भटके गोसावी समाजातील महिला, मुलेही सहभागी झाली. त्यांनी यावेळी शासनाच्या निषेधाच्या घोषणा देऊन तातडीने न्याय देण्याची मागणी केली.

Web Title: nomadic gosavi society to be noted that the Government