आयलँडच्या बकालपणावर खासगीकरणाचा पर्याय!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मे 2017

शहराचे वैभव वाढवण्यासाठी कऱ्हाड नगरपालिकेने विचार करण्याची गरज 
कऱ्हाड - शहरातील चौकांना बकाल स्वरूप येत आहे. दत्त चौकातील आयलँड त्याच्या नादुरुस्तीमुळे तर सातत्याने चर्चेत असते. शहरातील मुख्य चौकात जेथे जागा उपलब्ध आहे, तेथे खासगी तत्त्वावर ते विकासित केल्यास शहरातील वैभवात त्यामुळे भर पडेल व चौकांचेही सुशोभीकरण होण्यास मदत होईल. त्यामुळे पालिकेने शहराच्या वैभवात भर पाडून चौकांची निगा राहावी, यासाठी त्या पर्यायांचा विचार करण्याची गरज आहे, असा विचारप्रवाह पुढे येत आहे. 

शहराला मोठा वारसा आहे. ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्यामुळे कऱ्हाडची देशात ओळख निर्माण झाली. त्यांची कर्मभूमी असलेल्या कऱ्हाडच्या वैभवात भर घालण्यासाठी ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील यांनी शहराची रचना होतानाच ती नियोजनबद्धरित्या केली. त्यामुळे शहरात छत्रपती शिवाजी स्टेडियम, प्रीतिसंगम बाग, यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन, वेणूताई चव्हाण सभागृह, उपजिल्हा रुग्णालयालसह अन्य वास्तू उभ्या राहिल्याने शहराच्या वैभवात भर पडली आहे. त्यांच्यानंतर आलेल्या पालिकेतील सत्ताधाऱ्यांनीही आपल्या परिने शहराच्या वैभवात भर टाकण्याचे काम केले. अलीकडच्या काळात हे वैभव टिकवण्याचे काम अधिक वेगाने होणे आवश्‍यक आहे. 

मात्र, त्याला काही किरकोळ कारणांची कमतरता भासत आहे. शहरातील काही चौकांतील बकालपण हे त्याचे उदाहरण आहे. कोल्हापूर नाक्‍यावरून शहरात येणाऱ्या रस्त्याकडेला असलेले आयलँड, तेथून पुढे शहरातील मध्यवर्ती दत्त चौकातील दत्त मंदिरासमोरील आयलँड, कृष्णा नाका, रेव्हेन्यू क्‍लबसमोरील आयलँड, साईबाबा मंदिरासमोरील आयलॅण्ड, शाहू चौकातील आयलँडसह अन्य ठिकाणांच्या दुरवस्थेचा सातत्याने विषय चर्चेला येतो. दत्त चौकातील आयलँडची तर मध्यंतरी पडझडच झाली होती. मात्र, त्यावर कायमस्वरूपी तोडग्याची गरज आहे. पालिकेलाही संबंधित ठिकाणी खर्च करण्यास मर्यादा येत असतील तर खासगी तत्त्वावर संबंधित आयलँड व चौकांचे सुशोभीकरण करणे, हा त्यावरील पर्याय आहे. पालिकेने या पर्यायाचा स्वीकार केल्यास चौकांचे, आयलँडचे सुशोभीकरण होवून संबंधित जागेची निगाही चांगल्या प्रकारे राखली जाईल. त्याचबरोबर त्यांच्या विकासातून शहराच्या वैभवातही भर पडण्यास मदत होईल. 

Web Title: Option to privatize the island's duration!