श्री विठ्ठल मंदिराच्या सभामंडपात कर्मचाऱ्यांचे आंदोलन 

श्री विठ्ठल मंदिराच्या सभामंडपात कर्मचाऱ्यांचे आंदोलन 

पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्याने वशिल्याने दर्शनाला सोडण्यास नकार दिल्याने संतापलेले मंदिर समितीचे सदस्य सचिन अधटराव यांनी कर्मचाऱ्यास शिवीगाळ केली. या घटनेमुळे मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन आज सकाळ पासून काम बंद आंदोलन सुरु केले होते. हजारो भाविक दर्शनाच्या रांगेत उभे असताना अचानक सुरु झालेल्या या आंदोलनामुळे समितीचे काम ठप्प झाले होते. दरम्यान अधटराव यांनी दिलगिरी व्यक्त केल्यावर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. 

आषाढी यात्रेमुळे मंदिर समितीने व्हीआयपी दर्शन बंद केले आहे. अशाही परिस्थितीत काल (बुधवारी) रात्री मंदिर समितीचे सदस्य सचिन अधटराव यांनी काही भाविकांना वशिल्याने दर्शनाला सोडण्याचा आग्रह कर्मचाऱ्याकडे धरला होता. वरिष्ठांचा आदेश असल्याने वशिल्याने भाविकांना सोडता येणार नाही असे संबंधित कर्मचाऱ्यांने सदस्याला सांगितल्याने चिडलेल्या अधटराव यांनी कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली. 

दरम्यान या घटनेची माहिती आज मंदिर समितीच्या अन्य कर्मचाऱ्यांना समजल्यावर सर्वांनी मंदिराच्या सभामंडपात येऊन ठिय्या आंदोलन सुरु केले होते. या आंदोलना विषयी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ.अतुल भोसले यांना कळवण्यात आल्यावर त्यांनी 
तातडीने मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले. अधटराव यांनी कर्मचाऱ्यांच्या समोर येऊन दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com