पालखी मुक्कामाच्या ठिकाणांसह पंढरपुरात मद्यविक्रीस मनाई 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

सोलापूर  - आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात व पालखी मुक्कामाच्या ठिकाणी शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ मधील कलम १४२ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार पंढरपूर शहर व पालखी मुक्कामाच्या ठिकाणची सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

या आदेशानुसार पंढरपूर शहरात आषाढी एकादिशीनिमित्त ३ जुलै ते ५ जुलै २०१७ या कालावधतीत सर्व मद्यविक्री दुकाने बंद ठेवावीत. तसेच ८ ते ९ जुलै २०१७ कालावधीत पंढरपूर शहरात सायंकाळी ५ नंतर मद्यविक्री दुकाने बंद ठेवावीत. 

संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी मुक्कामाच्या ठिकाणी २८ जून, नातेपुते २९, माळशिरस, अकलूज ३० जून, वेळापूर, बोरगाव, श्रीपूर, माळीनगर एक जुलै, भंडशेगाव, पिराची कुरोली, वखारी येथील मद्यविक्री २ जून रोजी पूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच आषाढी वारीच्या अनुषंगाने ३ ते ५ जुलै या कालावधीत पंढरपूर शहरापासून ५ किमी परिसरातील देशी, विदेशी मद्यविक्री परवाना कक्ष पूर्ण दिवस आणि ८ ते ९ जुलै कालावधीत सायंकाळी ५ वाजेनंतर बंद ठेवावेत, असेही जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी आदेशात नमूद केले आहे. 

पश्चिम महाराष्ट्र

टाकळी ढोकेश्वर (नगर): दुष्काळी भागात दर दोन वर्षांनी नैसर्गिक कारणांनी निर्माण होणार्‍या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ही योजना...

01.48 PM

कोल्हापूर- जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्रीपासून संततधार सुरुच आहे. सर्व पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून मंगळवारी दुपारी...

01.27 PM

सुपे (नगर): अत्यंत गरिब परिस्थीतीतून माझ्या कुटुंबातील व शिक्षकांच्या पाठबळावर मिळालेला अण्णाभाऊ साठे पुरस्कार हा माझ्या जीवनातील...

01.27 PM