सर्व स्तरातील लोकांनी पाणी परिषदेत सहभागी व्हावे.. 

water
water

मंगळवेढा - तालुक्याचा दुष्काळी कलंक पुसण्यासाठी आपल्या एकीची ताकद सरकारला दाखविल्यास सरकार जागे होईल. शासनाला जाग आणण्यासाठी व दुष्काळी भागाला पाणी मिळवण्यासाठी सर्व स्तरातील लोकांनी पाणी परिषदेत सहभागी व्हावे असे आवाहन रौप्य महोत्सवी पाणी परिषदचे निमत्रंक वैभव नाईकवाडी यांनी बोलताना व्यक्त केले.

कृष्णा खोऱ्यातील तेरा दुष्काळग्रस्त तालुक्यांची रौप्य महोत्सवी पाणी परिषदेचे नियोजनाची बैठक येथील श्रीराम मंगल कार्यालयात घेण्यात आली. यावेळी वैभव नाईकवाडी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ.गणपतराव देशमुख, माजी आ राजेंद्रआण्णा देशमुख, चंद्रकांत देशमुख, बाबुराव गुरव, प्रा शिवाजी काळुंगे नानासो लिगाडे, नगराध्यक्षा अरुणा माळी, शैला गोडसे अॅड बी बी जाधव, सिद्धेश्वर हेंबाडे, अॅड राहुल घुले आदी उपस्थित होते.   

यावेळी बोलताना नाईकवाडी म्हणाले की, आपल्या पाणी प्रश्नाची दखल घेण्यासाठी प्रसंगी घराला कुलपे लावून या. संघटित होऊन जनजागृती करून परिषद यशस्वी केल्यास सरकारला दखल घ्यावीच लागेल. यावेळी बोलताना आ. देशमुख म्हणाले, मंगळवेढा तालुक्यातील हजारो एकर जमीनी उजनी पुनर्वसनासाठी संपादित केल्या. परंतु, 56 वर्षात केवळ 5 हजार एकरला पाणी मिळाले. बाकीच्यांना पाणी कधी मिळणार? पाणी परिषदेच्या माध्यमातून अशक्य असणाऱ्या योजना मार्गी लागल्या आहेत शासन केवळ आश्वासने देत असून, पाणीप्रश्न रखडवून ठेवत आहे. 35 गावच्या लोकांनी पाण्यासाठी बहिष्कार टाकूनही शासन दुर्लक्ष करीत आहे. मंगळवेढा उपसा सिंचन योजना मंजूर असताना सुद्धा शासन निधी देण्यास टाळाटाळ करीत आहे. या परिषदेत मंगळवेढ्याच्या पाणीप्रश्नाला या परिषदेत प्राधान्य दिले जाणार असून, त्याचे ठराव शासनाकडे पाठवून देवुन त्याच्या सोडवणुकीसाठी नागपूर अधिवेशनात सहकारी आमदारांसह आवाज उठविणार असल्याचे म्हणाले. 

यावेळी शिवाजी काळुंगे माजी आ राजेंद्र देशमुख, शैला गोडसे, चंद्रकांत देशमुख, अड बिराप्पा जाधव,अरुणा माळी यांनी विचार व्यक्त  केले. प्रास्तविकात अॅड भारत पवार यांनी मंगळवेढ्यात पाणी परिषदेच्या आयोजनामागील भूमिका मांडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com