जनतेने आपल्या लष्करावर विश्‍वास ठेवावा - डॉ. भामरे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2016

सातारा - भारतीय जवानांविषयी आम्हाला खूप अभिमान आहे. जनतेनेही आपल्या लष्करावर विश्‍वास ठेवावा, असे सांगत पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकविषयी अधिक बोलण्यास संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी आज येथे नकार दिला. त्याविषयी बोलण्याचे हे व्यासपीठ नाही, असे त्यांनी नमूद केले. सैनिक स्कूलच्या विकासाचा आराखडा तयार असून, लवकरच त्याची अंमलबजावणी होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

देशभरातील सैनिक स्कूलच्या प्राचार्यांची कार्यशाळा सातारा सैनिक स्कूलमध्ये सुरू आहे. त्यासाठी डॉ. भामरे आज साताऱ्यात आले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

साताऱ्यातील हे सैनिक स्कूल देशातील सर्वात जुने असून, या शाळेच्या गौरवशाली परंपरेचा अभिमान आहे, असे स्पष्ट करून डॉ. भामरे म्हणाले, ‘‘येथून आजपर्यंत अनेक विद्यार्थी बाहेर पडून सैन्यात विविध पदांवर कर्तव्य बजावत आहेत. देशासाठी प्राणार्पण करणारे हुतात्मा गलंडे व कर्नल महाडिक यांच्याविषयी आम्हाला अभिमान आहे. संरक्षण मंत्रालयालाही मोठी परंपरा असून, यशवंतराव चव्हाण यांनीही संरक्षणमंत्री म्हणून काम पाहिले आहे. त्याच मंत्रालयात मला काम करण्याची संधी मिळाली, याचा मला अभिमान वाटतो. सैनिक स्कूलचा विकास करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. समस्या व प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत; पण निधी मिळण्यात खूप अडचणी आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या समन्वयातून निधी मिळविण्याचा आमचा प्रयत्न आहे. याबाबत नुकतेच खासदार उदयनराजे भोसले यांनीही आपल्याला निवेदन दिले आहे.’’ 

‘‘लष्करात मुलांबरोबरच मुलीही मोठ्या संख्येने सहभागी व्हाव्यात, यासाठी आम्ही पावले उचलली आहेत. सैनिक स्कूलमधून एनडीएमध्ये २५ टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा, यासाठी शिक्षणात बदल करावा, अशा सूचना आम्ही स्कूल प्रशासनाला केल्या आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

Web Title: People trust on the army

टॅग्स