जलसंधारण चळवळीत लोकांचे श्रमदान 

हुकूम मुलाणी 
रविवार, 22 एप्रिल 2018

पाणी फाऊंडेशनच्या चळवळीत आज मंगळवेढ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी उत्सफुर्तपणे सहभाग घेत श्रमदान केले. लोकसहभागातून सुरू असलेल्या सुरू असलेल्या जलसंधारणाच्या चळवळीला आज (रविवार) सुट्टी असल्यामुळे लोकांचा सहभाग वाढला आहे. 

मंगळवेढा - पाणी फाऊंडेशनच्या चळवळीत आज मंगळवेढ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी उत्सफुर्तपणे सहभाग घेत श्रमदान केले. लोकसहभागातून सुरू असलेल्या सुरू असलेल्या जलसंधारणाच्या चळवळीला आज (रविवार) सुट्टी असल्यामुळे लोकांचा सहभाग वाढला आहे. 

चोखामेळानगरमध्ये केलेल्या श्रमदानात राष्ट्रवादीचे राहुल शहा, पी.बी.पाटील, पक्षनेते अजित जगताप, सोमनाथ माळी, अॅड. विनायक नागणे, नगरसेवक प्रवीण खवतोडे, बशीर बागवान, सागर केसरे आदीसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दुष्काळी ओळख पुसण्यासाठी सध्या पाणी फौऊडेशनच्या वतीने चोखोमेळानगर, डोंगरगाव कचरेवाडी, गणेशवाडी, खुपसंगी, लेंडवे, चिंचाळे, शिरसी, आसबेवाडी, येळगी, मारोळी, शिरनांदगी, रडडे निंबोणी, चिक्कलगी, लवंगी, महमदाबाद, गोणेवाडी, मुंढेवाडी या गावात वॉटर कप स्पर्धा सुरू आहे.

तालुक्यात पाणी फाऊंडेशनच्या कामाला वेग आला यामध्ये ग्रामीण भागातील पुरुष व स्त्रिया उत्सफुर्तपणे सहभागी होत असून तालुक्यात या श्रमदानाच्या चळवळीला भारतीय जैन संघटनेच्या वतीने जेसीबी देऊन सहभाग घेतला असताना खा. शरद बनसोडे व माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी डोंगरगाव येथे भेटी दिल्या. सध्या जलसंधारणाच्या कामाबरोबर नर्सरी तयार करणे, झाडे लावणे, शोष खड्डे तयार करणे, विहीर व बोअर पुनर्भरण करणे, माती परीक्षण करणे, आग मुक्त शिवार कंपोस्ट खत तयार करणे अशा प्रकारची कामे श्रमदानातुन सुरू आहेत.

Web Title: Peoples welfare work in the water conservation movement