पोलिस कर्मचाऱ्याचा विजेचा धक्काने मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

वाई : शांतीनगर (शहाबाग) येथील अजित उर्फ अंकुश जमदाडे (वय २७) याचा मंगळवारी (ता २२) सायंकाळी विजेचा धक्का बसून मृत्यू झाला, अजित मुंबई पोलिस दलात नोकरीला असून तो रजेवर घरी आला होता.

वाई : शांतीनगर (शहाबाग) येथील अजित उर्फ अंकुश जमदाडे (वय २७) याचा मंगळवारी (ता २२) सायंकाळी विजेचा धक्का बसून मृत्यू झाला, अजित मुंबई पोलिस दलात नोकरीला असून तो रजेवर घरी आला होता.

काल दुपारी 4 वाजता तो शेतात उसाला पाणी देण्यासाठी गेला होता. त्यावेळी शेवग्याची पट्टी नावाच्या शिवारात इलेक्ट्रिक पोलच्या तुटलेल्या विजेच्या तारेचा धक्का बसल्याने त्याचा मृत्यू झाला. रात्री उशीर पर्यंत अजित घरी आला नाही म्हणून त्याचे वडील व पत्नी शेतात बघायला गेले त्यावेळी अजितच्या अंगावर विजेची तार पडली होती. त्याला तातडीने खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता, या घटनेची रात्री उशिरा वाई पोलिसात नोंद झाली,

Web Title: Policeman dies of electricity