road
road

तीन महिन्यापूर्वीचा रस्ता खचला

पारनेर (नगर) : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सुमारे 28 लाख रूपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या कडूस, भोयरे गांगर्डा, रुईछात्रपती ते वाळवणे हा सुमारे तीन महिन्यापूर्वी झालेला रस्ता अतिशय किरकोळ झालेल्या पहिल्याच पाऊसात खचला असून अनेक ठिकाणी तो उखडला आहे. त्याची त्वरीत दुरूस्ती करावी अन्यथा 15 ऑगस्टला आत्मदहन करण्याचा इशारा संदीप साबळे यांनी दिला आहे.

साबळे यांनी कार्यकारी अभियंता यांना तशा प्रकारचे निवेदन दिले असून प्रत माहीती साठी  जिल्हा पोलीस अधिक्षक तसेच जिल्हाधिकारी यांनाही दिले आहे. या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ पालकमंत्री राम शिंदे तसेच आमदार विजय औटी यांच्या हस्ते झाले होते. त्या कामाच्या शुभारंभाचा त्या वेळी मोठा गाजावाजाही त्यांनी केला होता. 

या रस्त्याच्या निकृष्टज कामाबाबत  सकाळ ने काम सुरू असतानाच अनेक वेळा कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचे व मुरूमा ऐवजी माती मिश्रीत मुरूम वापरल्याचे तसेच योग्य प्रमाणात  डांबरही वापरले नसल्याचे वृत्त छापले होते. मात्र त्यानंतरही संबधीत ठेकेदारावर कार्यकारी अभियंता यांनी कोणतीच कारवाई केली नाही. ऊलट त्यांनी ठेकेदाराचे काम चांगले आहे असा शेरा दिला आहे.  निकृष्ट काम होत असतानाही मी स्वताः कामावर जाऊन पाहीले असता काम दर्जेदार असल्याचे कार्यकारी अभियंता यांनी सकाळला त्यावेळी सांगीतले होते अता मात्र रस्ता अनेक ठिकाणी खराब झाल्याने त्या ठेतकेदारासह कार्यकारी अभियंता  यांचे पितळ ऊघडे पडले आहे. या बाबत संबधीत ठेकेदारावर कारवाईकरावी अशी मागणी साबळे यांनी केली आहे. 

दोन शेतकऱ्यांच्या वादात काही रस्त्याचे काम अध्यापही रखडले असून त्याचा वाद न मिटल्याने ते काम अपुर्णच आहे. या अपूर्ण कामाबाबतही तोडगा काढावा असे ग्रामस्थांचे मत आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com