राष्ट्रपतींच्या उपस्थितीत शिंदेंना मानपत्र

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जुलै 2016

सोलापूर - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना महापालिकेच्या वतीने मानपत्र देण्याचा निर्णय आज झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. 4 सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम होणार आहे.

सोलापूर - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना महापालिकेच्या वतीने मानपत्र देण्याचा निर्णय आज झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. 4 सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम होणार आहे.

श्री. शिंदे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त हे मानपत्र देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवानी, अखिल भारतीय कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री विजय देशमुख, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, खासदार ऍड. शरद बनसोडे, आमदार प्रणिती शिंदे, आमदार सुभाष देशमुख यांचाही सत्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हा कार्यक्रम सुनियोजित पद्धतीने यशस्वी करण्यासाठी 15 समित्यांची नियुक्ती केली जाणार आहे. बैठकीला महापौर प्रा. सुशीला आबुटे, उपमहापौर प्रवीण डोंगरे, सभागृह नेता संजय हेमगड्डी, स्थायी समितीचे सभापती रियाज हुंडेकरी, नगरसेवक चेतन नरोटे, मनोहर सपाटे, अनिल पल्ली, उपायुक्त श्रीकांत मायकलवार, सहायक आयुक्त प्रदीप साठे, नगर अभियंता लक्ष्मण चलवादी, नगरसचिव ए. ए. पठाण उपस्थित होते.

राष्ट्रपतींचा दौरा
4 सप्टेंबर रोजी बिदरमार्गे दुपारी दोन वाजता राष्ट्रपती श्री. मुखर्जी यांचे विमानाने सोलापुरात आगमन होईल. दोन वाजून 25 मिनिटे ते तीन वाजून 25 मिनिटांपर्यंत ते शासकीय विश्रामधाममध्ये थांबतील. साडेतीन ते साडेचारपर्यंत ते श्री. शिंदे यांच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमास उपस्थित राहतील. पावणेपाच वाजता श्री. मुखर्जी विमानाने बिदरकडे रवाना होणार आहेत.

पश्चिम महाराष्ट्र

चित्रकथांनी रंगलेल्या भिंती... इंटरॅक्‍टिंग सेन्सॉर बोर्ड... एलईडी स्क्रीन... प्रोजेक्‍टर... शास्त्रज्ञ, महापुरुषांच्या...

07.12 PM

पंढरपूर - आषाढी यात्रेच्या निमित्ताने काढण्यात येणाऱ्या नाशिक ते पंढरपूर या सायकल दिंडीचे आज येथे आगमन झाले. नदीच्या पैलतीरावर...

02.54 PM

कोल्हापूर : ''धनगर समाजाला आरक्षण घटनेतच दिले आहे.'धनगड' या शब्दात बदल होऊन 'धनगर' असा उल्लेख झाल्यामुळे अनुसूचित जातीसाठी लागू...

12.48 PM