महिन्याला दहा हजारच काढता येणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 डिसेंबर 2016

जन-धन योजना - खातेदारांना एटीएम कार्ड मिळणार, बॅंकांची कार्यवाही सुरू

कोल्हापूर - जिल्ह्यात जन-धन योजनेची आठ लाख खाती उघडण्यात आली तरी नोटाबंदीनंतर या खात्यावर रक्कम जमा झालेली पाहता महिन्याला केवळ दहा हजार रुपयेच काढण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. खातेदारांना एटीएम कार्ड दिले जाणार असले तरी त्यातून दहा हजारच हाती 
मिळणार आहेत. 

जन-धन योजना - खातेदारांना एटीएम कार्ड मिळणार, बॅंकांची कार्यवाही सुरू

कोल्हापूर - जिल्ह्यात जन-धन योजनेची आठ लाख खाती उघडण्यात आली तरी नोटाबंदीनंतर या खात्यावर रक्कम जमा झालेली पाहता महिन्याला केवळ दहा हजार रुपयेच काढण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. खातेदारांना एटीएम कार्ड दिले जाणार असले तरी त्यातून दहा हजारच हाती 
मिळणार आहेत. 

जन-धन योजनेत ७ लाख ९६ हजार २५४ खाती उघडली गेली आहेत. ३३ बॅंकांच्या १५१ शाखांत खाती आहेत. या खातेदारांसाठी तीन लाख ६२ हजार ३१६ खातेदारांना एटीएम कार्ड दिली जाणार आहेत. त्या दृष्टीने बॅंकांनी कार्यवाही सुरू केली आहे; मात्र नोटाबंदीनंतर जन-धन योजनेच्या खात्यात पैसे टाकण्यासाठी झुंबड उडाली. पन्नास हजारांच्या वरील रकमेसाठी पॅन कार्ड सक्तीचे आहे. ज्यांच्याकडे बेहिशेबी पैसा आहे तो मुरविण्यासाठी जन-धन खात्याचा आधार घेतला गेला आहे. ज्या खात्यावर थोडी रक्कम होती त्यावर लाखाच्या घरात शिल्लक रक्कम दिसू लागली. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डसह कॅशलेस व्यवहार करण्याचे आवाहन बॅंकांनी केले. मात्र जन-धन खाते हे अनेकांसाठी पळवाट ठरू लागले आहे. काळा पैसा पांढरा करण्यासाठी खात्याचा आघार घेतला जाऊ लागला. त्यावर उपाय म्हणून आठवड्याला नव्हे तर महिन्याला दहा हजार रक्कम काढण्याची अट घातली गेली. यामुळे खातेदारांना एटीएम कार्ड मिळणार असले तरी तूर्तास त्याचा उपयोग होणार नाही. काळा पैसा मुरविण्याचे जे मार्ग आहेत, ते बंद करण्याचा प्रकार आहे. बॅंकांत जास्तीत जास्त खाती उघडावीत यासाठी जन-धन योजना राबविली जात आहे.

पश्चिम महाराष्ट्र

पुणे / कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी 2050 पर्यंत केंद्रात भाजपची सत्ता राहील, असे विधान नुकतेच...

04.33 PM

सोलापूर : देवेंद्र फडणवीस होश मे आओ, पोलिस होश मे आओ, शाहू-फुले-आंबेडकर आम्ही सारे दाभोलकर या घोषणा देत सोलापुरातील समविचारांनी...

03.33 PM

कोल्हापूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झोपडपट्टी पुर्नर्विकास योजनेतील भ्रष्टाचाराच्या आरोपातून आपली सुटका...

02.06 PM