पृथ्वीराज खडकेला राज्यस्तरीय कुस्तीत सुवर्ण, राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

प्रशांत चवरे
बुधवार, 30 मे 2018

भिगवण - येथील पृथ्वीराज मंगेश खडके याने नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. त्यामुळे त्याची मध्यप्रदेशमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

भिगवण - येथील पृथ्वीराज मंगेश खडके याने नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. त्यामुळे त्याची मध्यप्रदेशमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

नाशिक कुस्तीगीर असोशिएशनच्या वतीने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये पृथ्वीराज मंगेश खडके यांने 85 किलो वजन गटांमध्ये सहभाग घेतला होता. त्यांने साखळी सामन्यामध्ये अथर्व तांबे, सुभाष पाटील या मातब्बरांना चित करत अंतिम फेरीत प्रवेश केला. तर अंतिम सामन्यामध्ये त्याने पुण्याच्या सागर बराटेला 12 विरुध्द 4 अशा फरकाने विजय मिळवत सुवर्णपदक पटकावले. पृथ्वीराज खडके याची मध्यप्रदेशमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 

जिद्द व चिकाटीच्या जोरावर भिगवण सारख्या ग्रामीण भागातील पृथ्वीराज खडके यांने मिळविलेल्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याला सहयाद्री कुस्ती केंद्राचे वस्ताद विजय बराटे, मंगेश खडके, दिलीप पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. पृथ्वीराज यांने मिळविलेल्या यशाबद्दल बारामती कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष रामभाऊ देवकाते, कुस्तीगीर संघाचे जिल्हा उपाध्यक्ष सादिक आतार, महेश शेंडगे, आबासाहेब बंडगर, राजेंद्र जमदाडे यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

Web Title: Prithviraj Khadke got state-level wrestling gold, selected national competition