दूध धंद्यावरील दर घसरणीचे ढग जाता जाईना

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 एप्रिल 2018

रेठरे बुद्रुक (सातारा) : शेतकऱयांचे शेतीपूरक व्यवसायातील महत्वाचे साधन समजल्या जाणाऱया दूध धंद्यावरील दर घसरणीचे ढग जाता जाईनासे झाले आहेत. तब्बल नऊ महिन्यांपासून गायीच्या दूध खरेदी दराची घसरण सुरु आहे.

एेन उन्हाळ्यात पशुपालकांना दूधदराचा फटका सुरु असल्याने ते हतबल झाले आहेत. सध्या 3.5 फॅट व 8.5 एसएनएफसाठी प्रतिलिटर 21 रुपये 50 पैसे इतका कमी दर मिळत असल्याने त्यातून उत्पादनाचा खर्चदेखील पूर्ण होत नसल्याने शेतकऱयांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाचे ग्रामीण भागात मोठे प्रस्थ आहे. अनेक बेरोजगार तरुणांना या व्यवसायाने संजीवनी दिली आहे. शेतीचा खर्च दुधविक्रीतून पुर्ण करण्याची दैनंदिनी ठेवणाऱया शेतकऱयांना गेल्यावर्षीच्या आॅगस्टपासून दूध खरेदी दराच्या चिंतेने अक्षरक्षः ग्रासले आहे. जून 2017 अखेर प्रतिलिटर 27 रुपये दर होता. त्यातून उत्पादन खर्च वगळता चार पैसे गाठीशी रहायचे. परंतु आॅगस्ट 2017 पासून दराची घसरण सुरु झाली ती आजअखेर तशीच आहे.

साधारणतः सहा महिन्यांच्या टप्प्यात दूधदरात चढउतार होते. परंतु यावेळेस व्यवसायाचे चक्र उलटे फिरले आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून प्रतिलिटर 21 रुपये 50 पैसे इतका दर स्थिर आहे. यातून व्यवसायाचे व्यवस्थापन, चारा नियोजन, वीज या सगळ्याचा हिशेब पकडल्यास प्रतिलिटर मिळणारा दर शेतकऱयांना अडचणीत आणणारा ठरत आहे. पशुपालकांना दर वाढण्याच्या अपेक्षा आहेत. मात्र ते वाढतील अशी किंचितसीदेखील चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे दूधदराचे शेतकऱयांच्या डोक्यावरील ढग जाता जाईनासे झाले आहेत, हे नक्की.

कधी नव्हे इतकी दूधदराची यावेळेस घसरण झाली आहे. आजमितीला मिळणाऱया दूधदरातून उत्पादनासाठी येणारा खर्च निघेनासा झाला आहे. केवळ या व्यवसायात टिकून रहायचे व उभा केलेले भांडवल आपल्याजवळ रहावे, म्हणूनच आम्ही हा व्यवसाय चालवत आहे, असे पशुपालक जयवंत जगताप यांनी सांगितले.  

Web Title: problem of decreasing value of milk is still same