सोलापूर महापालिकेचा हा विक्रम लिम्का बुक ऑफ रेकार्ड मध्ये नोंदविण्याचा प्रस्ताव 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

सभा तहकूबीला वैतागून समस्त सोलापूरकर नागरिकांच्या वतीने युवक काँग्रेसच्या वतीने उपरोधीकपणे या सभा तहकूबीचा विक्रम लिम्का बुक ऑफ रेकार्डमध्ये नोंद करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस व नगरसेवक विनोद धर्मा भोसले यांनी केली आहे.

सोलापूर - महापालिकेच्या 23 पैकी 16 सभा विनाचर्चा तहकुब झाल्याने त्याची गिनीज बुक मध्ये नोंद करावी असा प्रस्ताव काँग्रेसचे नगरसेवक विनोद भोसले यांनी गिनीज बुककडे पाठविला आहे.

सोलापूर महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी 2017 मध्ये झाली. या निवडणुकीत 102 पैकी 49 ठिकाणी भाजपचे नगरसेवक निवडून आले. 8 मार्च 2017 ला पहिली सर्वसाधारण सभा झाली. त्यानंतरच्या 8 मार्च 2017 ते 31 मार्च 2018 दरम्यान 23 सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आल्या त्यापैकी तब्बल 16 सभा या कोणताही चर्चेवीना तहकुब करण्यात आल्या. ज्या अपेक्षेने सोलापूर शहरातील नागरिकांनी भाजपला बहुमत दिले. त्यापेक्षा या सत्ताधाऱ्यांकडून पूर्ण होताना दिसत नाहीत. भाजपमधील अंतर्गत गटबाजीमुळे नगरसेवकांमधील आजपर्यंत अनेकवेळा सभा तहकूब करण्यात आल्या.

या वारंवार सभा तहकूब करण्यामुळे शहरातील अनेक महत्वाचे विकासाचे विषय रेंगाळले आहेत. यामुळे या सभा तहकूबीला वैतागून समस्त सोलापूरकर नागरिकांच्या वतीने युवक काँग्रेसच्या वतीने उपरोधीकपणे या सभा तहकूबीचा विक्रम लिम्का बुक ऑफ रेकार्डमध्ये नोंद करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस व नगरसेवक विनोद धर्मा भोसले यांनी केली आहे. अशा प्रकारचा प्रस्ताव ई मेल द्वारा लिम्का बुक ऑफ रेकार्डकडे पाठविण्यात आला आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Proposal to register a record of Solapur Municipal Corporation in Limca Book of Records