पत्नीच्या खून प्रकरणी एकास जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

पत्नी सौ. आशा यांचा वारूंजी येथील शिवारात धारदार शस्त्राने गळा कापून खून केला होता. त्या प्रकरणी एकास जन्मठेप व पाच हजारांच्या दंडाची शिक्षा झाली आहे.

कऱ्हाड - सुमारे तीन वर्षापूर्वी पत्नीच्या खून प्रकरणी एकास जन्मठेप व पाच हजारांच्या दंडाची शिक्षा फौजदारी न्यायाधिश सी. पी. गड्डम यांनी आज ठोठावली. आप्पासाहेब सुरेश धुमाळ असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. डिसेंबर 2014 मध्ये त्याने पत्नी सौ. आशा यांचा वारूंजी येथील शिवारात धारदार शस्त्राने गळा कापून खून केला होता. त्या प्रकरणी कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात त्यावेळी चारित्र्याच्या संशयावरून खून केल्याचा गुन्हा दाखल होता. पोलिस निरिक्षक बी. आर. पाटील यांनी त्याचा तपास केला होता. वारूंजी येथे आप्पासाहेब यास खून करून पळून जाताना दोघांनी पाहिले होते. त्या दोघांसह त्यांची मुलगी मोहिनी व तपासी अधिकारी बी. आर. पाटील यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्याने शिक्षा ठोठावण्यात आली. सरकार पक्षातर्फे अॅड. मिलींद कुलकर्णी यांनी काम पाहिले. त्यांनी मांडलेला युक्तीवाद व साक्षीदारांच्या साक्ष ग्राह्य धरण्यात आल्या.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: punishment to a man for his wifes murder in karhad