राधानगरीच्या प्रांताधिकाऱ्यांच्या गाडीला अपघात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जुलै 2016

वहागाव (कऱ्हाड) : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वहागाव गावच्या हद्दीत चार चाकी दुभाजकाला धडकल्याने राधानगरी-कागलच्या प्रांताधिकारी मोनिका सिंग यांच्या आजी गंभीर जखमी झाल्या. मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. 

राधानगरीच्या प्रांताधिकारी मोनिका सिंग या त्यांच्या आजीसह प्रवास करीत होत्या. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने दुभाजकला धडकली. यामध्ये कपुरीदेवी सिंग (वय 93, रा. राधानगरी-कोल्हापूर) या जखमी झाल्या. पोलिस हवालदार एन. डी. चव्हाण तपास करीत आहेत.  