जिल्ह्यात पावसाची संततधार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जुलै 2016

सांगली - जिल्ह्यात सर्वच तालुक्‍यांत आजही पावसाची संततधार सुरू होती. शनिवारी रात्रभर पावसाने दमदार हजेरी लावली; तर आज सकाळच्या सत्रातही पावसाच्या मध्यम सरी पडल्या. शिराळ्याच्या पश्‍चिम भागात पावसाचा जोर वाढल्याने चांदोली धरणाच्या पातळीत अडीच मीटरने वाढ झाली. शिराळा तालुक्‍यात सर्वाधिक 26.8 मिलिमीटर पाऊस पडला; तर सर्वात कमी जत तालुक्‍यात 2.4 मिलिमीटरची नोंद झाली. शहरातही गेले पाच दिवस अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे दैनंदिन जीवन विस्कळित झाले आहे.

मॉन्सूनने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली आहे. मॉन्सूनपूर्व सरी दुष्काळी तालुक्‍यांत मोठ्या प्रमाणात कोसळल्या होत्या. त्यापाठोपाठ आता शिराळा, वाळवा, पलूस, मिरज तालुक्‍यांत संततधार पडत आहे. त्यामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. सांगली-मिरजेत आज सकाळपासून पावसाची थांबून थांबून रिमझिम सुरू राहिल्याने नागरिकांनी रविवारची सुटी घरीच घालवली. गुंठेवारीत मात्र सततच्या पावसाने दलदल झाली आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

वारणावतीला 70 मिलिमीटर पाऊस
शिराळा : तालुक्‍याच्या पश्‍चिम भागांत आज पावसाचा जोर वाढला. वारणावती येथे 24 तासांत 70 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. येथे अतिवृष्टी झाली आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने धरण पाणी पातळीत अडीच मीटरने वाढ झाली आहे. धरणात 27.03 टक्के पाणी साठा झाला आहे. तालुक्‍यात चांदोली धरण परिसर वगळता पावसाची रिमझिम सुरू आहे. मात्र धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. 24 तासात मंडलनिहाय झालेला पाऊस असा : शिराळा (34), शिरशी (15), सागाव (12), मांगले (32), कोकरुड (33), चरण (35), वारणावती (70) चांदोलीला ओढे-नाले भरले.