मन से रावण जो निकाले, राम उसके मन में है...!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

कोल्हापूर - ‘चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ती तिथी, गंधयुक्त तरीही वात, उष्ण ही किती, दोन प्रहरी का गं शिरी सूर्य थांबला, राम जन्मला गं सखे राम जन्मला...’ असे ‘गीतरामायण’ गात आज जिल्ह्यात रामनवमी भक्तिपूर्ण वातावरणात साजरी झाली. गीतरामायण सप्ताह, पालखी सोहळा, महाप्रसाद आणि रथोत्सवाने या उत्सवाला भव्यतेची किनार लाभली. दरम्यान, ‘मन से रावण जो निकाले, राम उसके मन में है...’ असा जागरही यानिमित्ताने विविध माध्यमांतून झाला. महालक्ष्मी मंदिर परिसरातील छत्रपती देवस्थान ट्रस्टच्या राम मंदिरात पहाटे अभिषेक घातला. दुपारी बाराच्या सुमारास जन्मकाळ सोहळा झाला.

कोल्हापूर - ‘चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ती तिथी, गंधयुक्त तरीही वात, उष्ण ही किती, दोन प्रहरी का गं शिरी सूर्य थांबला, राम जन्मला गं सखे राम जन्मला...’ असे ‘गीतरामायण’ गात आज जिल्ह्यात रामनवमी भक्तिपूर्ण वातावरणात साजरी झाली. गीतरामायण सप्ताह, पालखी सोहळा, महाप्रसाद आणि रथोत्सवाने या उत्सवाला भव्यतेची किनार लाभली. दरम्यान, ‘मन से रावण जो निकाले, राम उसके मन में है...’ असा जागरही यानिमित्ताने विविध माध्यमांतून झाला. महालक्ष्मी मंदिर परिसरातील छत्रपती देवस्थान ट्रस्टच्या राम मंदिरात पहाटे अभिषेक घातला. दुपारी बाराच्या सुमारास जन्मकाळ सोहळा झाला. यानिमित्ताने रामाचा पार परिसर फुलांच्या माळांनी सजविला होता, तर आकर्षक रोषणाईही केली होती. दीपक भागवत यांचे प्रवचन येथे झाले. सुरेंद्र झुरळे यांनी धार्मिक विधी केले. रात्री येथे रामरथोत्सव सोहळा उत्साहात साजरा झाला. 

मंगळवार पेठेतील राम गल्लीत बहुतांशी घरांसमोर गुढ्या उभारल्या. रांगोळ्या आणि फुलांच्या पायघड्यांसह पालखी सोहळ्याने अवघी मंगळवार पेठ भक्तिरसात न्हाऊन निघाली. येथील श्री राम तरुण मंडळातर्फे महाप्रसाद वाटप झाले. आठ हजारांवर भाविकांनी त्याचा लाभ घेतला. भागिरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक, वीरेंद्र मंडलिक, उद्योजक चंद्रकांत जाधव, नगरसेवक संभाजी जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. शाहूपुरी राधाकृष्ण मंदिरातही विविध कार्यक्रम झाले. दिलबहार तालीम मंडळ, साई भक्त मंडळातर्फेही पालखी सोहळा झाला. फुलांची आकर्षक सजावट येथे केली आहे. गंगावेशीतील श्रीकृष्ण दत्त सरस्वती महाराज मठी, रंकाळवेस तालीम मंडळ साई मंदिरातही विविध धार्मिक विधी झाले. चंद्रेश्‍वर गल्ली, उत्तरेश्‍वर पेठेतही राम जन्मकाळ सोहळा झाला. त्यानंतर पालखी मिरवणूक झाली. 

सुंठवडा कशासाठी?
चैत्र महिन्यात उन्हाच्या झळा अधिक तीव्र होतात. त्यामुळे उष्णतेचे विकार बळावतात. पचनशक्ती कमी झाल्याने भूकही कमी लागते. अंगदुखी, सांधेदुखी वाढते. त्यावर सुंठ व खडीसाखर ही उपयुक्त औषधे असून ‘सुंठवडा’ हे त्याचे मिश्रण असते. चैत्र महिन्यातील सर्व सण-उत्सवात त्याचे वाटप करण्याची परंपरा पूर्वापार रामनवमीच्या निमित्ताने यंदाही सर्वत्र जपली गेली. 

Web Title: Ram navami celebration in kolhapur