रत्नागिरी : कमी उत्पादनामुळे यंदा हापूस महागच

२५ एप्रिलनंतर मुबलक; उष्णतेमुळे हापूस भाजतोय
 हापूस
हापूस sakal

रत्नागिरी: उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये जाणवत असून त्याचा काही प्रमाणात हापूसलाही फटका बसत आहे. आंबा बाहेरुन भाजत असून साका होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. यंदा उत्पादन कमी असल्याने मुंबईतील वाशीसारख्या मोठ्या बाजारपेठेमध्ये वीस हजार पेटीच हापूस जात आहे. त्यामुळे हापूसचे दर चढेच आहेत. २५ एप्रिलनंतरच मुबलक हापूस बाजारात दाखल होणार असल्याने सर्वसामान्यांना अजुनही चव आंबटच आहे.

यावर्षी फेब्रुवारी महिन्यात आलेल्या मोहोराला काहीप्रमाणात फळं लागली; परंतु अवकाळी पावसामुळे ती रोगराईत सापडून गळून गेली. यामध्ये मोठा फटका आंबा बागायतदारांना बसलेला आहे. यावर्षी उत्पादनात मोठी घट दिसू लागली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार प्रत्येक महिन्यात पाऊस हजेरी लावत आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी हलका पाऊस, ढगाळ वातावरण अशी स्थिती गेले आठ दिवसात होती. याबरोबरच उष्णतेची लाटही कायम आहे. कडकडीत उन्हाचा परिणाम हापूसवर दिसून येतो. आंबा बाहेरुन भाजल्याने त्यात साका होऊ शकतो. पावसामुळे फळमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. दर्जेदार फळ शोधून ते बाजारात नेण्याचे आव्हान यंदा आंबा बागायतदारांपुढे आहे. पहिल्या टप्पयात बाजारपेठेतील आवक कमी असल्याने दर मात्र स्थिरावलेले आहेत. गुढीपाडव्यानंतर वाशीतील पेटींची संख्या लाखाच्या दरम्यान पोचते. यावर्षी वाशीमध्ये सध्या २० हजार पेटीच कोकणातून जात आहे. त्यामुळे पाच डझनच्या पेटीचा दर ५ हजार रुपयांपर्यंत आहे. रत्नागिरीतील काही बागायतदारांना जागेवर एवढा दर मिळत आहे. मार्केटींगमधील काही मोठ्या कंपन्याही थेट बागायतदारांच्या दरवाज्यात आंबा खरेदीसाठी येऊ लागल्याने वाशीतील बाजारात आंबा पेटी वीस टक्केने घटलेली आहे. तेथील दलालांची अनेक माणसे रत्नागिरीत येऊन माल खरेदी करत आहेत. हा मोठा बदल असल्याचे बागायतदारांचे मत आहे.

व्यावसायिकांच्या मतानुसार एप्रिल महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यातील चढे दर प्रथमच एवढे राहीले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना हापूसची चव घेता आलेली नाही. २५ एप्रिलनंतर आवक वाढण्याची शक्यता असून त्यानंतर सामान्य व्यक्तीला हापूस खरेदी करणे परवडेल.

बदलत्या वातावरणामुळे यावर्षी उत्पादनात मोठी घट झालेली आहे. परिणामी वाशी बाजारातील आवक अत्यंत कमी आहे. दरही चांगला असून तो अजून काही दिवस स्थिर राहील. आवक वाढण्यासाठी एप्रिल अखेरपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.

- देवेंद्र झापडेकर, आंबा बागायतदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com