उदं गं आई उदं...च्या गजरात रेणुकादेवीचा विवाह 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

कोल्हापूर - उदं ग आई उदं...च्या गजरात आज ओढ्यावरील रेणुका मंदिरात (यल्लमा) रेणुकादेवीचा विवाह सोहळा उत्साहात साजरा झाला. भाविकांनी पालखी सोहळ्यासह महाप्रसादाचा लाभ घेतला. ओढ्यावरील रेणुका मंदिरात प्रतिवर्षीप्रमाणे आज चैत्रशुद्ध पौर्णिमेदिवशी श्री रेणुका-जमदग्नी यांचा विवाह सोहळा झाला. सकाळी देवीस अभिषेक करून त्यानंतर अलंकारिक महापूजा बांधली. 

दुपारी एक वाजता देवीची आरती झाली. त्यानंतर अक्षता व पालखीचे पूजन झाले. पालखीची मंदिर प्रदक्षिणा झाली. हजारो भाविकांनी उदं ग आई उदंचा गजर करत देवीचे दर्शन घेतले. आज देवीचा वार मंगळवारच असल्याने मंदिरात सकाळपासून भाविकांची गर्दी होती. मंदिराशेजारील मोकळ्या जागेत मंडप उभा करून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. रात्री जागरणाचा कार्यक्रम झाला. पूजेसह धार्मिक विधी मदन आई शांताबाई जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त जोगती समाजाने केले.

Web Title: Renuka devi