सदाभाऊ खोत अखेर संकेतस्थळावर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 मे 2017

सातारा - कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना सातारा जिल्ह्याच्या सहपालकमंत्र्यांची धुरा देऊन चार महिने झाले तरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर त्यांचे छायाचित्र प्रसिद्ध केले नव्हते. त्याकडे ‘सकाळ’ने ता. ११ रोजीच्या अंकात लक्ष वेधले. त्याची दखल घेत जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी दिलेल्या सूचनेनुसार एनआयसीने मंत्री खोतांचे छायाचित्र संकेतस्थळावर प्रसिद्ध केले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने मंत्रिमंडळ विस्तारात कृषी राज्यमंत्री पदाची संधी स्वाभिमानी संघटनेची मुलूख मैदानी तोफ असलेल्या सदाभाऊंना दिली. त्यांना सातारा जिल्ह्याचे सहपालकमंत्रिपद देऊन मानही दिला. मात्र, त्याला चार महिने होऊनही मंत्री खोत यांचे छायाचित्र जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले गेले नव्हते. त्याची दखल घेत ‘सकाळ’ने ‘मान मिळाला.., पण स्थान कुठंय?’ अशा शीर्षकाखाली स्वाभिमानी संघटनेतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भावना मांडल्या होत्या. ‘सकाळ’ने पुढे आणलेले वास्तव स्वीकारत जिल्हाधिकारी सिंघल यांनी संकेतस्थळावर बदल करण्याच्या सूचना नॅशनल इन्स्टिट्यूट सेंटरला (एनआयसी) दिल्या. त्यानुसार सदाभाऊ खोत यांचे छायाचित्र पालकमंत्री विजय शिवतारे यांच्याबरोबरीने प्रसिद्ध करण्यात आले आहे.