सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात विना परवाना फिरणाऱ्या ट्रेकर्सना अटक

sanhyadri-vyaghra-prakalpa
sanhyadri-vyaghra-prakalpa

कऱ्हाड- सह्याद्री व्य़ाघ्र प्रकल्पाच्या कोकण किनार पट्टीवरून शिकारींसह पर्यटक बिनधास्त सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये प्रवेश करत आहेत. या प्रकरणी एक मे रोजी सायंकाळी बारा ट्रेकर्सना अटक झाली. व्याघ्रच्या कोअर झोनमध्ये विना परवाना फिरत येणाऱ्यांसह शिकारीच्या उद्देशाने येणाऱ्या राज्याभरातील वेगवेगळ्या भागातील सुमारे पन्नासवर लोकांना दोन वर्षात अटक झाली आहे. याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामागे वन्य जीव विभागाचा त्या भागात गस्त घालण्याचा हालगर्जीपणा कारणीभूत आहे. त्याशिवाय तेथे मार्गावरही ठोस उपाय नसल्याचेही मोठे कारण आहे. 

सातारा, सांगली, कोल्हापूर व रत्नागीरी या जिल्ह्याच्या सीमीवर्ती भागात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प साकारला आहे. त्या प्रकल्पात सुमारे 85 किलोमीटरचा कोकण पट्टा येतो. त्या कोकण किनार पट्ट्यावर सुरक्षेचा प्रश्न नेहमीच एरणीवर असतो. या चोरट्या वाटांवर अनेक लोक सहज व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये येताना दिसातात. त्यात काही शिकारींचाही समावेश आहे. 

त्या मार्गावरून व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या सुमारे पन्नासपेक्षाही जास्त लोकांना दोन वर्षात अठक झाली आहे. त्या वाटांवर संरक्षण कुटी उभ्या कराव्यात, अशी पर्यावरण प्रेमींची मागणी आहे. ती किती योग्य आहे, हे काल वन्य जीव विभागाने बारा ट्रेकर्सना अटक केलेल्या घटनेवरून स्पष्ट झाले. 

काही दिवसात सुमारे 43 संरक्षण कुटी बसवण्यात आल्या. मात्र त्यात कोकण किनार पट्टीचा समावेश नव्हता. त्याला काही तांत्रिक गोष्टी कारणीभूत आहेत. त्याकडे दुर्लक्षून चालणार नाही. कोकण किनार पट्टीवर त्या संरक्षण कुटी बसवण्यासाठी त्याचा भौगोलीक अभ्यास करण्याचे काम सुरू आहे. त्या संरक्षण कुटी होतीलही मात्र तोपर्यंत कोकण किनारपट्टीवर लक्ष ठेवण्यासाठी येथे गस्त घालण्याचे नियोजन केले होते. त्यात नियोजनाचा अभाव असल्याने कोकण किनार पट्टी असुरक्षीत आहे. ते वारंवार समोर येते आहे. 

गस्त घलाण्यासाठी त्या मार्गावर बोटींग, पायलटींग, पट्रोलींग अशा अनेक प्रकारे लक्ष ठेवण्याच्या स्पष्ट सुचना आहेत. मात्र त्या कर्मचारी हालगर्जीपणा करत आहेत. त्याचाच पारिपाक म्हणून कोअर झोनमध्ये लोकांचा होणारा शिरकावाकडे पहावे लागेल. पर्यावरण प्रेमींनी अनेक वेळा लेखी व तोंडी वन्यजीवच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना पुराव्या सह माहिती दिली आहे. त्यांनी कोकण किनार पट्टीच्या चोरट्या वाटांवर लोक व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोन असलेल्या कोयनेत चोरून येत आहेत. त्यात काही ट्रेकर तर आहेतच. मात्र काही वेळा शिकारी येतात, असे पर्यावरण प्रेमींना स्पष्ट केले आहे.

मात्र वरिष्ठ अधिकाऱ्याने त्याकडे कानडोळा केला आहे,  प्रत्येक वेळेला असे कोणी येत नाही, कोणी वास्तव्य करत नाही अशी उत्तर देवून वास्तावाकडे दुर्लक्ष केले आहे. पुरावा म्हणून अनेक व्हिडीओ, छायाचित्र दाखवली गेली. मात्र त्याकडेही लक्ष दिले गेले नाही. व्याघ्र प्रकल्पात फिरती गस्त वाढवली पाहिजे. सहा महिन्यापूर्वी शिकारी बंदूक घेऊन आल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले होते. त्यावेळी कोकणातील पाचजणांना अटक केली होती. काही लोक तर रोज छोट्या दिंगी बोटीने कोयना धरणाकडे येताना दिसतात. ते कोठे राहतात? शिकार करतात का? याची माहिती घेवून त्यांच्यावर कारवाई होण्याची गरज आहे. 

कोकण किनारपट्टीचे असुरक्षीत मार्ग 
- चिपळूणहून नंदिवशेमार्गे डिचोली येथे मुक्काम केला जातो. 
- नांदिवशेमार्गे गॉगत्याच्या खोऱ्यात उतरतात. 
- गॉगत्याच्या खोऱ्यातून शिरशिंगेकडे प्रवास केला जातो.
- काही लोक कोकणातील खालून मार्गान भैरवगडला येतात. 
- भैरवगडाकडून मळे कोळणेलाही जातात. 
- भैरवगडावरून बंदी असलेल्या प्राचितगडला अनेकजण जातात. 
- कोयना भागातीलच जंगली जयगडला खालून कोकणातून लोक वर येतात. 
- जयगडाहून काही लोक डिचोली येथे जावून मुक्काम करतात. 

व्याघ्र प्रकल्पात सुमारे 85 किलोमीटरची कोकण किनार पट्टी येते. त्या किनारपट्टीवर अद्ययावकत कॅमेऱ्यांसह संरक्षण कुटी बसवण्यात येणार आहे. त्यासाठी भौगोलीक अभ्यास सुरू आहे. लवकरच त्या मार्गावर सुरक्षेचे ठोस उपाय हाती घेण्यात येणार आहेत. त्यासाठीही आम्ही पाठपुरावा करत आहोत. 
विनीता व्यास, उपसंचालक, सह्याद्री व्याघ्र प्रल्प, कऱ्हाड 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com