आक्षेपार्ह मजकुराबद्दल 'सनातन'ला नोटीस

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जानेवारी 2017

तावडेला हजर करण्याचा आदेश; पुढील सुनावणी 6 फेब्रुवारीला
कोल्हापूर - "सनातन'चा साधक समीर गायकवाड आणि डॉ. वीरेंद्र तावडे हे निरपराधच असल्याचे वृत्त "सनातन'च्या नियतकालिकात प्रसिद्ध करून न्यायालयाचा अवमान केला आहे. यावरून "सनातन'ला यापूर्वीच नोटीस दिली असल्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी शनिवारी सुनावणीवेळी जाहीर केले.

तावडेला हजर करण्याचा आदेश; पुढील सुनावणी 6 फेब्रुवारीला
कोल्हापूर - "सनातन'चा साधक समीर गायकवाड आणि डॉ. वीरेंद्र तावडे हे निरपराधच असल्याचे वृत्त "सनातन'च्या नियतकालिकात प्रसिद्ध करून न्यायालयाचा अवमान केला आहे. यावरून "सनातन'ला यापूर्वीच नोटीस दिली असल्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी शनिवारी सुनावणीवेळी जाहीर केले.

दुसरा संशयित वीरेंद्र तावडेला न्यायालयात हजर न केल्याबद्दल त्यांनी तपास यंत्रणेला खडसावले. पुढील सुनावणी 6 फेब्रुवारीला होईल. त्याला पुढील सुनावणीत न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी न्यायालयाला सांगितले. ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयात खटला सुरू आहे. यातील आरोपी समीर गायकवाड सध्या कळंबा कारागृहात आहे.

तेथे त्याला "सनातन'ची नियतकालिके, अगरबत्ती, जपमाळ आणि गोमूत्र देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्याचे वकील समीर पटवर्धन यांनी न्यायालयाकडे केली. तसेच काही महिन्यांपूर्वी कारागृहात पाठवलेली नियतकालिके परत आल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. यानंतर ही नियतकालिके न्यायालयात हजर केली. विशेष सरकारी वकील राणे यांनी त्यातील आक्षेपार्ह मजकूर वाचला. न्यायालयात खटला सुरू असताना संबंधितांना निरपराध असल्याचे म्हणणे म्हणजे न्यायालयाचा अवमान आहे, असे राणे यांनी निदर्शनास आणून दिले. या वेळी याच मुद्द्यावरून यापूर्वीच "सनातन'ला नोटीस बजावल्याचे न्यायाधीश बिले यांनी सष्ट केले. अवमानाच्या विषयावर गंभीर चर्चा सुरू असतानाच ऍड. पटवर्धन यांनी दिलगिरी व्यक्त केली.

पानसरे हत्येतील दुसरा संशयित वीरेंद्र तावडे याला न्यायालयात हजर का केले नाही? त्याच्यावर या न्यायालयात खटला सुरू आहे. त्याला वॉरंट बजावले आहे. तो जगातील कोणत्याही कारागृहात असो, त्याला न्यायालयात हजर करण्याची जबाबदारी तपासी अधिकाऱ्यांची आहे, अशा शब्दांत न्यायाधीशांनी तपास यंत्रणेची कानउघडणी केली.

हा तर न्यायालयाचा अवमान
"निरपराध हिंदूंना जेलमध्ये डांबून ठेवले जाते, त्यांचा छळ केला जातो. असा छळ करणाऱ्यांना हिंदू राष्ट्रामध्ये दुप्पट शिक्षा दिली जाईल,' अशा आशयाचा मजकूर "सनातन'च्या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध केला आहे. खटला सुरू असताना असे भाष्य करणे म्हणजे न्यायालयाचा अवमान आहे, म्हणूनच नोटीस बजावल्याचे न्यायाधीशांनी सुनावणीवेळी जाहीर केले.

पश्चिम महाराष्ट्र

कऱ्हाड : गुलाल खोबऱयाची उधळण व फळांचा वर्षाव करत शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या भिम-कुंती उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. '...

09.00 AM

कोल्हापूर - "जहॉं हम खडे होते हैं लाईन वहीं से शुरू होती है,' अमिताभ बच्चन यांचा "कालिया' चित्रपटातील हा फेमस डायलॉग....

06.03 AM

मिरज - मिरजेतून सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर मार्गावर लोकल सोडण्याच्या हालचाली पुन्हा सुरू झाल्या आहेत. पुण्याहून पहिली...

05.48 AM