सांगली - अखेरच्या षटकाचा प्रचार फेऱ्यांमध्ये थरार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जुलै 2018

सांगली : क्रिकेटच्या मैदानातील अखेरच्या षटकाचा थरार आज सर्वच पक्षांच्या प्रचार फेऱ्यांमध्ये जाणवत होता. सकाळपासूनच शहरातील प्रमुख चौका चौकात कार्यकर्ते-नेते फेऱ्यांच्या तयारीसाठी दाखल झाले होते. कॉंग्रेस-राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेसह अपक्षांच्या अघाडीनेही प्रचार फेऱ्यांवर भर दिला होता. अपक्षांनी मात्र "होम टू होम' प्रचारावर भर दिला होता. अखेरचे काही तासच शिल्लक राहिल्याने प्रत्येकानेच पायाला भिंगरी लावलीय. 

येत्या एक ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी गेल्या आठवड्याभरापासून सर्वच पक्ष अपक्षांचा प्रचाराचा धडाका होता. प्रभागाची व्याप्ती अधिक असल्याने यंदा फेसबुक, वॉट्‌सप आणि डिजिटल व्हॅनवरील प्रचारावर अधिक भर होता. गेल्या दोन दिवसांपासून प्रचार फेऱ्या शहरात काढल्या जात आहे. आज जाहीर प्रचार टिपेला पोहचला होता. खणभाग, गावभाग, मारुती रस्ता, उत्तर शिवाजीनगर, विश्रामबाग, वखारभाग अशा गर्दीच्या परिसरात फेऱ्या आणि डिजिटल वाहनांचे ताफे एकमेकांवर अक्षरक्ष कडी करीत होते. जागोजागी फटाक्‍यांच्या माळांचा कडकडाट सुरु होता. सुहास्य मुद्रेने सामोरे जाणारे कार्यकर्ते उमेदवार पाहून लोकही धन्य होत होते. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कुपवाडमध्ये काही प्रभागात फेऱ्या काढल्या. आमदार सुधीर गाडगीळ,सुरेश खाडे, कॉंग्रेस नेत्या जयश्री पाटील, विशाल पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, पृथ्वीराज पाटील, संजय बजाज अशा मात्तबर पायाला भिंगरी बांधून शहर पिंजून काढताना दिसत होते. मोठ्या संख्येने आज नागरीकांचाही सहभाग दिसत होता.

Web Title: sangali municipal corporation elections last day of campaign