कोल्हापूर सर्किट बेंचसाठी सांगलीत वकिलांचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

सांगली - उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात सुरू व्हावे, या मागणीसाठी सांगली बार असोसिएशनतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांना निवेदनही देण्यात आले.

सांगली - उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात सुरू व्हावे, या मागणीसाठी सांगली बार असोसिएशनतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांना निवेदनही देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे, की उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात सुरू व्हावे, या मागणीचा लढा ३० वर्षे सुरू आहे. सर्किट बेंचचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून
 घेतला. त्यामुळे खंडपीठ कृती समितीने पुन्हा नव्याने लढ्याची सुरवात केली. त्याचा पहिला टप्पा म्हणून गेले ६० दिवस साखळी उपोषण सुरू आहे. मात्र, या आंदोलनाची दखल राज्य शासनाने घेतलेली नाही. त्यामुळे रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहोत. शासन यानिर्णयाबाबत ठोस भूमिका घेत नाही. त्यासाठी वकिलांना रस्त्यावर उतरावे लागते आहे. तत्काळ निर्णय न झाल्याने तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला. अध्यक्ष ॲड. एच. जी. प्रताप, उपाध्यक्ष एस. डी. चव्हाण, सचिव सी. ए. चौगुले, एस. के. मदाळे, सनी जमादार, पी. के. जाधव, अर्चना उबाळे, मायादेवी पाटील, नीरा पाटील, श्रीकांत जाधव, सर्जेराव मोहिते, सचिन ताम्हणकर, भाऊसाहेब पवार, एम. एम. पखाली, माणिक पवार उपस्थित होते.

पश्चिम महाराष्ट्र

कऱ्हाड : जुलैच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने कोयनेचे सहा वक्र दरवाजे प्रथमच आॅगस्टच्या पूर्वी उघडले....

01.36 PM

कोल्हापूर : घराची वाटणी वादातून सख्या भावावर हल्ला करण्याचा प्रकार आज (बुधवार) सकाळी दहाच्या सुमारास घडला. या हल्ल्यात...

11.30 AM

तळेगाव दिघे (जि. नगर) : गणेशोत्सव वर्गणीतील जमा झालेल्या रकमेतून मोठी गणेशमुर्ती, मोठा देखावा, महाप्रसाद असा खर्च केला जातो....

10.33 AM