सांगलीतील आंबेडकर स्टेडियममधील अतिक्रमणे हटविण्याची "सम्यक'ची मागणी

सांगलीतील आंबेडकर स्टेडियममधील अतिक्रमणे हटविण्याची "सम्यक'ची मागणी

सांगली - येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमच्या जागेत व्यायाम मंडळासह झालेली बेकायदा अतिक्रमणे तत्काळ हटवण्यात यावीत, अशी मागणी आज सम्यक विद्यार्थी आंदोलनच्यावतीने करण्यात आली. महापौर हारुण शिकलगार यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.

निवेदनातील आशय असा - 

सांगली नगरपालिकेने सप्टेंबर 1986 मध्ये संबंधित व्यायाम मंडळाशी करार केला. एक हजार चौरस मीटर जागा वार्षिक शंभर रुपये दराने नव्यान्नव वर्षांच्या कराराने दिली दिली आहे. आंबेडकर स्टेडीयम महानगरपालिका यांच्या मालकी वहिवाटीचे आहे. या करारनुसार या जागेचा वापर व उपयोग खेळाच्या प्रसाराच्या उद्देशा खेरीज अन्य कारणासाठी वापर करता येणार नाही, ही जागा क्रीडांगणासाठी व खुली जागा म्हणून ठेवावी त्यावर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करता येणार नाही, त्या जागेच्या वापरामुळे नगरपालिकेच्या कोणत्याही कामास व उपयोगास अडथळा येता कामा नये, या जागेचा वापर सार्वजनिक स्वरूपात करता येईल, ही गरज लागेल तेव्हा नगरपालिकेने केव्हाही परत घेण्याचा हक्क लागेल आदी अटी करारात आहेत. प्रत्यक्षात या अटींचे उल्लंघन झाले आहे. क्रीडांगणाच्या पश्‍चिम-दक्षिण कोपऱ्यात बेकायदा भिंत या व्यायाम मंडळाने बांधल्याने नागरिकांना या जागेचा सार्वजनिक वापर करता येत नाही. बेकायदा भिंती मध्ये एक गेट केले आहे. मंडळाने नियमभंग केल्याने ते पाडण्यात यावे. 

जिल्हाध्यक्ष अमोल वेटम, अमोल हर्ष, विकास कांबळे, स्वप्नील खांडेकर, दशरथ नाईक, संतोष करे, पवन राठोड, रोहित राठोड, राज सनदी, पवन भंडारे, प्रशांत कांबळे, रविराज कांबळे, अनिल राठोड आदींनी हे निवेदन दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com