सांगली: अनिकेत कोथळेच्या मृत्यूप्रकरणी 7 पोलिस निलंबित

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

पोलिस कोठडीत अनिकेत कोथळे आणि अमोल भंडारे यांच्यावर थर्ड डिग्री वापरत असताना ड्युटीवर असणारे ठाणे अंमलदारासह त्याचा मदतनीस, कोठडीचे चार गार्ड, वायरलेस आॅपरेटर या सर्वांना निलंबित करण्यात आले. रात्रीच त्यांच्या निलंबनाचे आदेश बजावण्यात आले. 

सांगली : शहर पोलिस ठाण्यात पोलिस कोठडीत थर्ड डिग्री वापरल्याने ठार झालेल्या अनिकेत कोथळे प्रकरणी ठाणे अंमलदारासह आणखी सात कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे. 

पोलिस मुख्यालयात काल शुक्रवारी रात्री या कर्मचार्‍यांना निलंबनाचे आदेश देण्यात आले. 
सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक संजयकुमार, अतिराक्त महासंचालक कायदा सुव्यवस्था बिपीन बिहारी यांनी विशेष महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अप्पर अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्यासह वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेतली. 

पोलिस कोठडीत अनिकेत कोथळे आणि अमोल भंडारे यांच्यावर थर्ड डिग्री वापरत असताना ड्युटीवर असणारे ठाणे अंमलदारासह त्याचा मदतनीस, कोठडीचे चार गार्ड, वायरलेस आॅपरेटर या सर्वांना निलंबित करण्यात आले. रात्रीच त्यांच्या निलंबनाचे आदेश बजावण्यात आले. 

दरम्यान, सीआयडीने स्टेशन डायरीसह महत्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.