‘अण्णा’ म्हणणाऱ्या कोंबड्याचे मौन !

स्वप्नील पवार
सोमवार, 28 मे 2018

देवराष्ट्रे - त्यानं भल्या पहाटे बांग दिलीच नाही... तो ‘अण्णा अण्णा’ म्हणून ओरडायला लागला... अण्णा, ताडकन्‌ उठून बसले अन्‌ कोंबड्याची बांग साऱ्या सोशल मीडियावर पसरली. कोंबडा बोलतो, अण्णा अण्णा म्हणतो हे महाराष्ट्रभर झाले... त्याला काहीच दिवस सरलेत; मात्र आता त्या खुराड्यात शांतता पसरली आहे. तो कोंबडा आता अबोल झाला आहे. तो ना अण्णा म्हणतो, ना बांग देतो.

दोन महिन्यांपूर्वी आळसंद गावातील उमरकांचन वस्तीवरील लक्ष्मण मोहिते यांचा कोंबडा राज्यातील ‘ब्रेकिंग न्यूज’ झाला. लक्ष्मण यांना सारेच अण्णा म्हणतात. त्यांना लळा लावलेला कोंबडाही मग अण्णा म्हणू लागला. हौसाबाई मोहिते यांच्याशी तो बोलायचा. कोंबडा अण्णा म्हणतोय, ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. अनेकजण प्रत्यक्षात ते पाहायला यायला लागले. लाखो लोकांनी सोशल मीडियावर ते पाहिले, लाईक अन्‌ शेअर केले. माणसाप्रमाणे पोपट आवाज काढतो; मात्र कोंबडा बोलायला लागल्याची ही अपवादात्मक घटना चर्चेत राहिली. आता मात्र कोंबडा शांत झाला आहे. तो काहीच बोलत नाही. अण्णा म्हणत नाही. 

तो अण्णा म्हणू दे किंवा नाही म्हणू दे, तो भरपूर जगावा, अशी मोहिते कुटुंबीयांची इच्छा आहे. आता तो पुन्हा कधी अण्णा म्हणतोय का, याकडे मात्र अनेकांचे लक्ष असणार आहे. कारण, त्याला सिनेमात संधी मिळणार आहे.

आमच्या कोंबड्यामुळे आळसंद गावासह उमरकांचनचे नाव महाराष्ट्रभर झाले. राज्य व परराज्यांतून लोक येऊन गेले. हा कोंबडा आता सिनेमातही झळकणार होता; पण आता तो शांत झालाय. आता गर्दीही कमी झालीय.
- हौसाबाई मोहिते

Web Title: Sangli News Anna Saying hen silence