हॉटेल मालकावर माधवनगरमध्ये हल्ला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

सांगली - माधवनगर जकात नाक्‍याजवळील संगम हॉटेलमध्ये बिल देण्याच्या वादातून हॉटेल मालक प्रकाश आनंदा शेट्टी (वय २५, रा. माधवनगर) यांच्यावर हल्ला झाला.

सांगली - माधवनगर जकात नाक्‍याजवळील संगम हॉटेलमध्ये बिल देण्याच्या वादातून हॉटेल मालक प्रकाश आनंदा शेट्टी (वय २५, रा. माधवनगर) यांच्यावर हल्ला झाला.

सायंकाळी सहाच्या सुमारास हा प्रकार घडला. चार हल्लेखोरांनी हत्यार टाकून पलायन केले. जखमी शेट्टी यांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. संजयनगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत याची नोंद झाली नव्हती. 

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी ः माधवनगर जकात नाक्‍याजवळ हॉटेल संगम आहे. महापालिका क्षेत्रात असल्याने या हॉटेलची दारू विक्री सुरू झाली आहे. आज सहाच्या सुमारास चौघेजण हॉटेलमध्ये  आले. 
त्यावेळी सहाशे रुपये बिलावरून मालक प्रकाश शेट्टी आणि चौघांमध्ये वाद झाला. वाद टोकाला गेल्यानंतर चौघांनी ग्लास फेकून मारला. शेट्टी यांच्या डोक्‍याला जखम झाली. त्यानंतर चौघांनी हत्यार काढून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. परिसरातील लोकांची गर्दी झाल्यानंतर चौघांनी पळ काढला. पोलिस निरीक्षक रमेश भिंगारदिवे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. हत्यार जप्त करून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली.