व्यापाऱ्यांनी पाच अडत्यांचे बेदाण्याचे ९० लाख अडकविले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 सप्टेंबर 2017

सांगली - व्यापाऱ्यांनी बेदाणा पेमेंटचे पाच अडत्यांचे तब्बल ९० लाख रुपये अडकवले आहेत. मागील काही दिवसांपासून संबंधित व्यापाऱ्यांकडे पाठपुरावा केला असता त्यांच्याकडून दाद मिळाली नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार असोसिएशनला देण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. ९ ऑक्‍टोबरपासून बेदाणा सौदे बंद होणार असून ४ नोव्हेंबरला पुन्हा 
सुरू होतील. 

बेदाणा असोसिएशनचे अध्यक्ष मनोज मालू यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. मागील काही महिन्यांपासून बेदाण्याचा प्रश्न सातत्याने निर्माण होत आहे. मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी पाच अडत्यांचे ९० लाख रुपये अडकवले आहेत. बेदाण्याचे पेमेंट देण्याची मागणी केली जात आहे, परंतु संबंधित व्यापाऱ्यांकडून दाद देत  नाहीत. अडत्यांची रक्कम अडकल्याने एवढे मोठे  पेमेंट कसे करायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. व्यापाऱ्यांकडे देणे असूनही ते अन्यत्र व्यापार करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित व्यापाऱ्यांवर कारवाईचा निर्णय बेदाणा असोसिएशनने घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली होती. संबंधित व्यापाऱ्यांकडे अडते आणि शेतकऱ्यांनी माल घालू नये, माल दिल्यास फसवणूक होण्याची भीती आहे, त्यामुळे दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  

दिवाळीपूर्वी झिरो पेमेंटसाठी बेदाण्याचे सौदे बंद केले जातात. त्यानुसार ९ ऑक्‍टोबरपासून बेदाण्याचे सौदे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. दिवाळीनंतर असोसिएशन क्‍लिअरिंग हाऊस म्हणून काम पाहणार आहे. चाळीस दिवसात पेमेंट झाले पाहिजे. सौदे बंद झाल्यानंतर तसा प्रयत्न करण्यात येणार आहे. ४ नोव्हेंबरपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार असून त्यानंतर नव्याने सौदे सुरू होणार आहेत. उपाध्यक्ष कुमार शेटे, विनायक हिंगमिरे, राजेंद्र कुंभार यांच्यासह बेदाणा  व्यापारी आणि अडते उपस्थित होते.