कोल्हापूर-पुणे, पुणे-सातारा पॅसेंजर वेळेत बदल 

कोल्हापूर-पुणे, पुणे-सातारा पॅसेंजर वेळेत बदल 

मिरज - कोल्हापूर-पुणे आणि पुणे-सातारा या पॅसेंजर रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. कोल्हापूर-पुणे गाडी पुण्यात सुमारे पावणेदोन तास अगोदर पोहोचेल. पुणे-सातारा पॅसेंजर दोन तास लवकर सुटेल.

पुणे-सातारा दरम्यानच्या नोकरदार, विद्यार्थी प्रवाशांच्या सोयीसाठी बदल केल्याचे मध्य रेल्वेच्या पुणे कार्यालयातून सांगण्यात आले. एक मार्चपासून महिन्यासाठी प्रायोगिक तत्वावर नव्या वेळानुसार गाड्या धावतील. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून नवे वेळापत्रक कायम केले जाईल. 

कोल्हापूर-पुणे (51410) पॅसेंजर कोल्हापूरहून पहाटे 4.45 वाजता सुटते. मिरजेत सहा वाजता येते. पुण्यात दुपारी 4.25 वाजता पोहोचते. नव्या वेळापत्रकानुसार ती पुण्यात 105 मिनिटे अगोदर म्हणजे दुपारी 2.40 वाजताच पोहोचेल. परतीसाठी (51435) पुण्यातून सायंकाळी 5.05 वाजता सुटते. आता दोन तास उशीरा म्हणजे सायंकाळी 07.10 वाजता निघेल. सांगली, मिरज व कोल्हापुरातील वेळापत्रकात कोणताही बदल नाही. 
पुण्यातून सायंकाळी कार्यालये सुटल्यानंतर (पाचनंतर) साताऱ्यासाठी पॅसेंजर नाही. प्रवाशांना रात्री उशिराच्या एक्‍सप्रेस गाड्यांतून, एसटीने साताऱ्याला परतावे लागते. हे लक्षात घेऊन हा बदल केला आहे. 

कोल्हापूर-पुणे पॅसेंजर मार्गात अनेक स्थानकांत पंधरा ते तीस मिनिटांचे थांबे नाहक घ्यायची. हे सर्व थांबे दोन-पाच मिनिटांवर आणलेत. त्यातून 105 मिनिटांची बचत केली. त्यामुळे पॅसेंजर दुपारी 4.25 ऐवजी 2.40 वाजताच पोहोचेल. या पॅसेंजरने पुण्यात जाऊन एक-दोन तासांची कामे करुन साडेचारच्या निजामुद्दीन एक्‍सप्रेसने सांगली-कोल्हापुरला परतणे शक्‍य झाले आहे. 

नवे वेळापत्रक असे (कंसात सध्याची वेळ) 

साताऱ्यातून पुण्यासाठी ः (गाडी 51410) 
सकाळी 9.50 ( 10.35 ). जरंडेश्‍वर 10.00 ( 10.53 ). पळशी - 10.15 ( 11.06 ). वाठार - 10.30 ( 11.19 ). आदर्की - 10.45 ( 11.40 ). सालपा - 10.55 ( 12.17 ). लोणंद - 11.10 ( 12.30 ). नीरा - 11.30 ( 12.58 ). वाल्हे - 11.45 ( 01.12 ). दौंडज - दुपारी 12.00 ( 01.26 ). जेजुरी - 12.20 ( 01.59 ). राजेवाडी - 12.35 ( 02.14 ). आंबले - 12.45 ( 02.23 ). शिंदवणे - 01.00 ( 02.38 ). आळंदी - 01.10 ( 03.30 ). फुरसुंगी - 01.20 ( 03.43 ). सासवड - 01.30 ( 03.53 ). घोरपडी - 01.50 ( 04.10 ). पुणे - 02.40 ( 04.25 ). 

पुण्यातून साताऱ्याकडे ः (गाडी 51435) 
सांयंकाळी 07.10 ( 05.05 ). घोरपडी - 07.18 ( 05.14 ). सासवड - 07.30 ( 05.27 ). फुरसुंगी - 07.37 ( 05.38 ). रात्री आळंदी - 07.45 ( 05.55 ). शिंदवणे - 07.55 ( 06.07 ). आंबले -08.08 ( 06.27 ). राजेवाडी - 08.15 ( 06.34 ). जेजुरी - 08.35 ( 06.52 ). दौंडज -08.45 ( 07.04 ). वाल्हे - 08.55 ( 07.17 ). नीरा - 09.15 ( 07.35 ). लोणंद - 09.30 ( 07.46 ). सालपा - 09.40 ( 08.03 ). आदर्की - 09.55 ( 08.30 ). वाठार - 10.25 ( 08.48 ). पळशी - 10.35 ( 09.01 ). जरंडेश्‍वर - 10.45 ( 09.16 ). सातारा - रात्री 11.45 ( 09.45 ). 

(एक मार्चपासून महिन्यासाठी प्रायोगिक तत्वावर नव्या वेळापत्रकानुसार गाड्या धावतील. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून नवे वेळापत्रक कायम केले जाईल.) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com