चायना मेड सजावट साहित्याला दणका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

सांगली - समाज माध्यमांवर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे. त्यात सैनिक म्हणतो, ‘मी चीनला सीमेवर रोखतो आणि तुम्ही त्याला बाजारपेठेत रोखा....’ अशा शेकडो व्हायरल पोस्टचा परिणाम म्हणून की काय यंदाच्या गणेशोत्सवात चिनी बनावटीच्या सजावट साहित्याच्या विक्रीला मोठा फटका बसला आहे.  

डोकलाम सीमेवरील सध्याच्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर समाजमाध्यमांमध्ये चीनविरोधात मोठी नेटीझन्स मंडळींकडून मोठी मोहीम राबवली जात आहे. त्याचे पडसाद बाजारपेठेत उमटत असल्याचे व्यापाऱ्यांचे निरीक्षण आहे.

समाजमाध्यमांवर एखादा ट्रेंड निर्माण झाला तर त्याचे विविध अंगाने प्रतिबिंब समाजात उमटत असते. गेल्या दोन महिन्यांपासून भारत-चीनमध्ये तणावाचे वातावरण आहे. चिनी वस्तुंवर बहिष्काराचे आवाहन केले जात आहे. नेटीझन्सनी तर चीनचे बाजारपेठेत कंबरडे मोडले तर सीमेवर तो सरळ होईल अशी प्रचार मोहीम चालवली आहे. परिणामी भारतीयांनी चालवलेले चायनीज रेस्टॉरंटवरील चायनीज शब्दावर फुली मारली आहे. अर्थात तिथल्या व्यवसायावर परिणाम  झाल्याचे फारसे कोणी सांगत नाही मात्र चिनी वस्तुंच्या खरेदीवर मात्र  काही अंशी परिणाम झाल्याचे व्यापाऱ्यांचे निरीक्षण आहे. विशेषतः यंदाच्या गणेशोत्सवात मोठ्या संख्येने आयात होणार चिनी मालाला खीळ बसली आहे. त्यात सजावटीच्या साहित्याचा मोठा वाटा आहे. विद्युत माळा, विद्युत झोत टाकणारे दिवे, फुलांच्या माळा, विद्युत सजावट साहित्य अशा नाना गोष्टी गेल्या काही वर्षांमध्ये चीनमधून येत आहेत. त्यांनी बाजारपेठेचा ताबा घेतला आहे. अतिशय स्वस्तात मिळणाऱ्या या वस्तुंमुळे गणपती देशी असला तरी त्याची सजावट मात्र चिनी होती. या चित्राला यंदा काही अंशी फाटा बसला आहे. व्यापाऱ्यांनी विविध संघटनांच्या भीतीमुळेही चिनी माल मागवणे  टाळले आहे. शिवाय ग्राहकांकडून भारतीय बनावटीच्या साहित्याची मागणी होत आहे. गणेशोत्सवाबरोबरच दसरा-दिवाळीतही चिनी मालावंर अघोषित बहिष्काराची स्थिती निर्माण होण्याची शक्‍यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

सार्वजनिक आणि घरगुती गणपतीच्या सजावटीसाठी भारतीय बनावटीच्या वस्तू अनेक ग्राहकांकडून आवर्जून मागितल्या जात आहेत. सजावटीचे साहित्य दरवर्षी नवीन घ्यावे लागते ही चिनी बनावटीच्या वस्तूंबाबत होते. तुलनेने भारतीय सजावट साहित्य महाग असले तरी टिकाऊ असते. लोकांनाही ते पटू लागले आहे.
- दिनेश मोहनानी, विकी शंभवानी, व्यापारी

दरवर्षी कोणतीही चौकशी न करता सजावट साहित्य खरेदी करीत असे. यंदा मात्र मी भारतीय बनावटीचे साहित्याने गणेश मूर्ती सजवणार आहे. मूर्तीवरचा फोकस लाईट असो किंवा विद्युत माळा भारतीय बनावटीच्या असतील. 
- शीतल हजेरी, ग्राहक

Web Title: sangli news China Made Decoration Material